Naxal Encounter: बिजापूरमध्ये पुन्हा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 31 नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxal Encounter In Bijapur: नक्षलवाद आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झालीय. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ही चकमक झाली असून यात 31 नक्षलवादी ठार झालेत.
Naxal Encounter In Bijapur
Naxal Encountersaam
Published On

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात चकमकीत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय. डीआरजी आणि एसटीएफच्या ऑपरेशन दरम्यान २ जवान शहीद झालेत. तर २ जण जखमी झालेत. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात चकमकीत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय. डीआरजी आणि एसटीएफच्या ऑपरेशन दरम्यान २ जवान शहीद झालेत. तर २ जण जखमी झालेत.

बिजापूर जिल्ह्यातील एडापल्ली परिसरात ही चकमक घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, डीआरजी आणि एसटीएफच्या जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडली. जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजेपासून चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने नक्षलांच्या मोठ्या टोळीला घेराव घालत ही कारवाई केली. यामध्ये डीआरडी, एसटीएफ, कोब्रा २०२२ आणि सीआरपीएफ २२२ बटालियनच्या टीमने संयुक्त कारवाई केली. या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले असून सर्वांचे मृतदेह सापडले आहेत.

छत्तीसगडमधील नक्षलवाद्याचा खात्मा अॅण्टी नक्षल ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यात सुरक्षा दलाला यश मिळत आहे. थेट एन्काउंटर केला जात असल्याने नक्षलवादी आपला ठिकाणा बदलताना दिसत आहेत. नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने ऑपरेशन लॉन्च केलं. यात DRG, STF आणि बस्तर फायटरचे जवानांचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये वर्ष २०२५ मध्ये या घटनेआधी ४९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com