Assembly Election: पिपाणीने वाढवलं तुतारीचं टेंशन; निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची पिपाणी हटवण्याची मागणी फेटाळली

Assembly Election: लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे तुतारी चिन्ह असलेल्या शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे पिपाणी हे चिन्ह काढून घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
Assembly Election: पिपाणीने वाढवलं तुतारीचं टेंशन; निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची पिपाणी हटवण्याची मागणी फेटाळली
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांच्या पक्षाने पिपाणी हटवण्याची मागणी केली होती. ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळलीय. निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलंय? याबरोबरच लोकसभेला नेमका पिपाणीचा कसा फटका बसला होता? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

लोकसभा निवडणूकीत पिपाणीमुळे तुतारीला मोठा फटका बसलाय. त्यामुळे विधानसभेला चिन्हांच्या यादीतून पिपाणी हटवण्याची मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाची मागणी फेटाळून लावलीय. त्यामुळे विधानसभेला पिपाणीने तुतारीचं टेंशन वाढवलंय..

Assembly Election: पिपाणीने वाढवलं तुतारीचं टेंशन; निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची पिपाणी हटवण्याची मागणी फेटाळली
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची घोषणा, कोण काय म्हणालं?

विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पवारांची मागणी फेटाळली असली तरी लोकसभा निवडणूकीत पिपाणी चिन्हाचा तुतारीला फटका बसल्याचा दावा पवारांच्या पक्षाने केला होता. मात्र हा फटका कसा बसला? पाहूयात.

Assembly Election: पिपाणीने वाढवलं तुतारीचं टेंशन; निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची पिपाणी हटवण्याची मागणी फेटाळली
Assembly Election: महायुतीच सरकार पूर्ण बहुमताने निवडून येईल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

पिपाणीने वाढवलं तुतारीचं टेंशन

लोकसभा मतदारसंघ

सातारा

पिपाणीला 37 हजार 62 मतं

शरद पवारांच्या उमेदवाराचा 32 हजार मतांनी पराभव

दिंडोरी

पिपाणीला

1 लाख 3 हजार मतं

बीड

पिपाणीला 54 हजार 850 मतं

बारामती

पिपाणीला 14 हजार 917 मतं

शिरुर

पिपाणीला 28 हजार 330 मतं

अहमदनगर

पिपाणीला 44 हजार 597 मतं

माढा

पिपाणीला 58 हजार 421 मतं

भिवंडी

पिपाणीला 24 हजार 625 मतं

रावेर

पिपाणीला 43 हजार 982 मतं

वर्धा

पिपाणीला 20 हजार 795 मतं

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोगाने पिपाणी चिन्ह न हटवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा निर्णय पवारांनी मान्य केलाय. लोकसभा निवडणूकीत पिपाणी चिन्हाने लाखो मतं घेत तुतारीचं टेंशन वाढवलं होतं. मात्र आता निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह हटवण्याची मागणीच फेटाळून लावल्याने तुतारी वाजवणारा माणूस लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि लोकसभेत बसलेला फटका टाळण्यासाठी पवार काय रणनीती आखणार? यावर विजयाचं गणित अवलंबून असेल. पिपाणीमुळे तुतारीचं टेंशन वाढलंय एवढं मात्र नक्की..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com