मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर विधानसभेची मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागांवर उमेदवार उभे करतो, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच अनेक राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर आज मुख्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर करताच सर्व राजकीय नेते सक्रिय झाले आहे. या विधानसभा निवडणुकीवर विविध राजकीय नेत्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हणाले की, 'लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. आता दिवाळीत प्रकाश पर्व असेल. त्यापाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला साजरे करू. भाजपच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या. येत्या 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या. या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा. विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघत आहे'.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'मागील दोन वर्षांत आमचं कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी अशा अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढुया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवुया'.
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीका केली. विजय वडेट्टीवार म्हणाले, 'निवडणूक जाहीर करण्यास उशीर झालाय. कारण सरकार घाबरलं होतं. गेल्या महिन्याभरात २७५ जीआर काढले. जाहिरातबाजी करून जनतेच्या पैशांचा चुराडा केला. त्यांच्या फसव्या आणि जुमलेबाज जाहिरातीला जनता मतदार भीक घालणार नाही. तेलंगणा येथील योजना बंद असताना जाहिरात दिली. मध्य प्रदेशातील भगिनींना चार महिन्यांपासून खात्यात पैसे आले नाहीत. काँग्रेसच्या राज्यासंदर्भात खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. आम्ही लाडकी बहिण योजना बंद करू असा दावा त्यांनी केला'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.