सागर निकवाडे, साम प्रतिनिधी
नंदुरबारमध्ये महायुतीला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी बंडखोरी केलीय. भापजने हिना गावित यांना दिलेला उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा क्षेत्रातून त्या अपक्ष लढणार असल्याने महायुतीत बंडखोरी झालीय.
हिना गावित आता अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी, काँग्रेसचे के सी पाडवी यांना आव्हान देणार आहेत. महायुतीकडं शिवसेनेना शिंदे गटाला ही जागा मिळाली असून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. डॉ. हिना गावित यांचा अपक्ष उमेदवार अर्ज अवैध ठरल्याने आता अक्कलकुवा अक्राणी मतदार संघात महायुती बिघाडी झाल्याचं चित्र आहे.
माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी २८ तारखेला अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे एक आणि दुसरा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला महायुतीमध्ये ही जागा सुटलीय. मात्र शिंदे गटातर्फे जाहीर झालेले उमेदवार आमश्या पाडवी विधान परिषदेचे आमदार आहेत, मग पुन्हा त्यांना आमदार होण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करीत डॉ. हीना गावित यांनी ही जागा भाजपला द्या, आम्ही निवडून आणतो, असा आग्रह धरला होता. त्यानंतर त्यांनी अर्ज भरला. मात्र भाजपकडून करण्यात आलेला अर्ज अखेर बाद झाला.
राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात महाआघाडीतर्फे ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. तर महायुतीतर्फे शिंदे शिवसेनेला देण्यात आली आहे. काँग्रेस तर्फे ॲड.के.सी.पाडवी यांना तर शिंदे शिवसेनेततर्फे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. असं असताना ही जागा आम्हाला मिळावी. अशी मागणी करत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावित यांनी भाजपातर्फे आणि एक अपक्ष असे दोन नामांकन दाखल केले.
मात्र आज छाननी दरम्यान हिना गावित यांनी भाजप तर्फे दाखल केलेला अर्ज अवैद्य ठरला असून अपक्ष भरलेला फॉर्म हा वैद ठरलेला आहे. डॉक्टर हिना गावित यांचा अपक्ष उमेदवारीमुळे आता अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात महायुती त मोठा वाद होण्याची शक्यता आहे ..
अहिल्यानगर मध्येही महायुतीला बंडखोरीचा फटका बसलाय. जय हरी आमदार म्हणून परिचित असलेले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय. उमेदवारी न दिल्याने बाळासाहेब मुरकुटे नाराज आहेत. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याऐवजी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलीय. नाराज झालेल्या मुरकुटेंचा निवडणूक लढवण्याचा निर्धार अशून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.