विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भरघोस यश दिलंय. या निवडणूकीच्या निकालानंतर भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निकालावर सर्व जनतेचं लक्ष होतं. आणि जशी अपेक्षा होती त्याचनुसार याठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना एक लाख ७५ हजार ६२ मतं मिळाली.
यावेळी शिवेंद्रराजे तब्बल एक लाख ४२ हजार १२४ च्या मताधिक्याने निवडून आले. यावेळी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांसमोर एकच जल्लोष केला.
हजारो कार्यकर्त्यांसमोर, नाद करायचा नाही...आमचा नाद करायचा नाही या गाण्यावर थिरकले आमदार शिवेंद्रराजे भोसले. 1,42,124 एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर शहरातून मिरवणूक काढल्यानंतर गांधी मैदान परिसरात आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी केल्याचं दिसून आलं.
भाजप महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्यावर जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विश्वास आखवला तो मी अखेर सार्थ केला आहे. मी माझ्या मतदार संघातील मतदार बांधवांचे जाहीर आभार मानतो.
सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजकारणात अनेक वर्षे एक्टिव्ह असले तरी शिवेंद्रसिंहराजेंच्या तुलनेत अमित कदम हे तुल्यबळ दिसून येत नव्हते. यामुळे या ठिकाणची निवडणूक एकतर्फी होणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
शिवेंद्रराजे भोसले (भाजपा) – १,१८,००५
दीपक पवार (राष्ट्रवादी) – ७४,५८१
अशोक गोरखनाथ दीक्षित (वंचित) – ३१५३
शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) – ९७,९६४
दीपक पवार (भाजपा) – ५०,१५१
दगडू सकपाळ (शिवसेना) – २५,४२१
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.