Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

Dharmarao Baba Atram Criticized Sharad Pawar: महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका होऊ लागली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Dharmarao Baba Atram: शरद पवार यांच राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान
Dharmarao Baba Atram saam tv
Published On

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. राज्यामध्ये आता पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. विधानसभा निवडणूक निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कमी जागेवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात यश आले.

आता यावरूनच महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका होऊ लागली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शरद पवार यांच राजकारण संपले, ते नाटक होतं.', असं मोठं विधान त्यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला की, 'शरद पवार यांचं राजकारण संपले. ते नाटक होतं. विरोधकांचे राजकारण संपले.'

Dharmarao Baba Atram: शरद पवार यांच राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान
Assembly Election 2024: विधानसभेची तयारी पूर्ण, 288 मतदारसंघात किती मतदार? पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली, वाचा संपूर्ण अहवाल!

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. आपल्या विजयाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, 'माझा नसून लोकांचा विजय होता. २०२९ च्या निवडणुकिसाठी आतापासून कामाला लागल पाहिजे. पुतण्या असो की मुलगी असो त्यांना शुभेच्छा. महत्वाचे म्हणजे आमच्या योजना आणि कामाची पद्धत दादांनी जे सहकार्य केलं त्याचा विजय आहे. हा निकाल फार मोठा विजय आहे.'

Dharmarao Baba Atram: शरद पवार यांच राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान
Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

शरद पवारांवर टीका करताना आत्राम यांनी सांगितले की, 'पहिले पक्ष फोडायचं काम केलं. घर फोडण्याच काम केलं. पुढे ते स्वतः संपले. फक्त १० आले. झालं त्यांचा आता राजकारण संपलं. शरद पवार यांचे राजकारण संपलं. पावसात भिजले ते नाटकं होते. त्यांनी ती नाटकं केली पण काही जमलं नाही. १० शिल्लक राहिले तेही आपल्यामध्ये घेऊन टाकू. माझं काही बोलणं झालं नाही. पाच वर्षे लोकांचं काम करता इतकच.'

Dharmarao Baba Atram: शरद पवार यांच राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान
Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

तसंच, 'मुख्यमंत्री होईल ते बोलणं चुकीचं होईल. पण आम्हाला वाटते चांगलं पद म्हणजे दादांना उपमुख्यमंत्री पद मिळेल. विरोधक संपले, सगळे चांगले. बरं झालं ते पाच-पाच नाही आले. काही शिल्लक राहिले नाही आहे.', अशा शब्दात त्यांनी शरद पवारांसह विरोधकांना टोला लगावला.

Dharmarao Baba Atram: शरद पवार यांच राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान
Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com