Belapur : संदीप नाईकांचा 377 मतांनी निसटता पराभव, अपक्ष संदीप नाईकांना 513 मते, तुतारीसारख्या ट्रम्पेटलाही भरघोस मते

sandip naik vs manda mhatre, Belapur Assembly Election Results 2024 : बेलापूर विधानसभेत ट्रम्पेट चिन्ह आणि नाम साधर्म असलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांना फटका बसल्याची चर्चा आहे.
 sandip naik vs manda mhatre, Belapur Assembly Election Results 2024
sandip naik vs manda mhatre, Belapur Assembly Election Results 2024 sandip naik vs manda mhatre, Belapur Assembly Election Results 2024
Published On

belapur vidhan sabha result 2024 : विधानसभेत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. १३२ जागा जिंकत भाजप महायुतीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. मुंबई आणि उपनगरात भाजप महायुतीला दणदणीत यश मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी घासून लढती झाल्या. धाकधाकू वाढवणाऱ्या लढतीत भाजपने विजय मिळवला.बेलापूर मतदारसंघातही भाजपचा विजय झाला, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांचा निसटता पराभव झाला. पण त्याला नावाचे साधर्म असलेला उमेदवार अन् चिन्ह कारण असल्याचं समोर आलेय.

बेलापूर विधानसभेत ट्रम्पेट चिन्ह आणि नाम साधर्म असलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांना मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) तुतारी चिन्हावर लढणाऱ्या संदीप नाईक यांचा फक्त ३७७ मतांनी पराभव झाला. त्याला ट्रम्पेट चिन्ह अन् संदीप नाईक नावाचा अपक्ष उमेदवार एक कारण असल्याचे दिसतेय.

बेलापूरमध्ये भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होती. यामध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी विजय मिळवला. अटतीतटीच्या लढतीत मंत्रा म्हात्रे यांचा ३७७ मतांनी विजय झाला. अपक्ष असणाऱ्या प्रफुल्ल म्हात्रे यांना २८६० मते मिळाली. त्याचं चिन्ह तुतारीसारखेच दिसणारे ट्रम्पेट चिन्ह होतं. त्याशिवाय अपक्ष असणारे संदीप नाईक यांना ५१३ मते मिळाली आहेत. ट्रम्पेट चिन्ह आणि नाम साधर्म असलेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे संदीप नाईक यांचा पराभव झाल्याची चर्चा बेलापूरमध्ये होत आहे.

BELAPUR Assembly Constituency result - मंदा म्हात्रे यांचा विजय, नाईकांचा पुन्हा पराभव

बेलापूर मतदारसंघ निवडणुका जाहीर झाल्यापासून चर्चेत होता. संदीप नाईक भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण त्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे संदीप नाईक यांनी ऐन विधानसभेत तुतारी हाती घेत मैदानात उतरले. बेलापूरमध्ये नाईक आणि म्हात्रे यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत झाली. यामध्ये म्हात्रे यांनी बाजी मारली. मंदा म्हात्रे यांना 91852 इतकी मते मिळाली. तर संदीप नाईक यांना 91475 इतकी मते मिळाली. मंदा म्हात्रे यांचा 377 मतांनी विजय झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com