महाराष्ट्रात एकीकडे महायुतीची विचारधारा आहे, जी यावर अभिमान बाळगते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे विचार आहेत. जे महाराष्ट्राचं अपमान करत आहे. महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झाले आहेत. ही आघाडी आहे, जी राममंदिराचा विरोध करते, जे मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्द आणते. ही जी आघाडी आहे, ते नेहमी वीर सावरकरांचा अवमान करते. काश्मीरमध्ये कलम ३७० च्या वापसीसाठी प्रस्ताव मंजूर करते. असं म्हणत पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर घाणाघाती टीका केली.
सरकार बनवण्यासाठी काँग्रेस त़डफडत आहे. पाण्याविना मासे तडफडतात, तसे एसटी ओबीसी एसटीची एकजूट तोडू पाहत आहेत. म्हणून ते आपापसात त्यांच्यात भांडणे लावतात. मजबूत काँग्रेस होईल. एसटी-एससी, ओबीसींना उद्ध्वस्त करतील. म्हणून मी वारंवार सांगतो की, आघाडीचे लोक ज्या प्रकारे कारनामे करत आहेत, तेव्हा एक गोष्ट खूप महत्वाची झाली आहे. की एक है तो सेफ है.
मुंबईत तर बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचे शहर आहे. स्वाभिमानाचं शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँघ्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. महाराष्ट्रातील आपल्या अखरेच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा भाजपा महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती असल्याचा नारा दिला. आमच्यासोबत म्हणजेच महायुतीसोबत संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे.
महाराष्ट्रात आज या निवडणुकीची ही माझी अखेरची प्रचारसभा आहे. मी या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र, कोकण प्रत्येक भागातील लोकांशी संवाद साधला. सर्वकडे एकच आवाज ऐकू येत आहे, तो म्हणजे भाजपा महायुती आहे तर गती आहे.
महाराष्ट्रात एकीकडे महायुतीची विचारधारा आहे, जी यावर अभिमान बाळगते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे विचार आहेत, जे महाराष्ट्राचं अपमान करते. महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झालेत. ते राममंदिराचा विरोध करतात. मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्द वापरतात. ही जी आघाडी आहे, ते नेहमी वीर सावरकरांचा अवमान करते. काश्मीरमध्ये कलम ३७० च्या वापसीसाठी प्रस्ताव मंजूर करते.
राजकारणात एक दुसऱ्यावर वार -पलटवार करणे समजू शकतो. भाजपचा महायुतीचा हा मंत्र आहे की, नीती आहे, वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. पण आघाडीसाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष मोठा आहे. भारत जेव्हा पुढे जातो, तेव्हा आघाडीवाल्यांना त्रास होतो. भारताच्या प्रत्येक य़शावर आघाडीवाले प्रश्न उपस्थित करते . यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. पण आम्ही मराठी भाषेला हा सन्मान दिला तर यांच्या पोटात दुखतं. म्हणून तुम्हाला महाविकास आघाडीच्या राजकारणापासून, त्यांच्या हेतूपासून सावध राहायला हवं.
मुंबई स्वप्नांचं शहर आहे. महायुती स्वप्नांना साकार करणारं गठबंधन आहे. गरीब, मध्यमवर्ग, सामान्य माणूस ज्यांना कैक दशके स्वप्ने बघण्याची संधी मिळाली नाही, आज त्यांचे स्वप्न पुूर्ण होत आहे. आमच्या सरकारने स्टार्ट अप अभियान सुरू केले. मुंबईत मोट्या संख्येने स्टार्ट अप आले,. गरिबांना पहिल्यांदा पीएम आवास योजनांमध्ये पक्की घरे मिळाली. मध्यमवर्गीयांना कमी व्याजाने होम लोन मिळत आहे.
७० लाख रेडी पटरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजनेच्या मदतीने आपला व्यापार वाढवण्यास मदत मिळाली. त्याचा फायदा मुंबईचे १ लाखांहून अधिक जणांना याचा लाभ मिळाला आहे. मुंबईच्या सहकाऱ्याचे आभार मानतो. एक वर्षापूर्वी त्यांच्या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली होती. सेवाभावनेने काम फक्त भाजप आणि महायुतीच करू शकते. नम्रतेने तुम्हाला सांगतो की, तुमचे स्वप्नच आमचा संकल्प आहे,. मोदी तुमच्या स्वप्न जगतात. तुमच्या स्वप्नांसाठी जागं राहतो. ते पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करण्याची गॅरंटी देतो
आमच्या देशात स्वातंत्र्यानंतर कैक दशके काँग्रेसचे सरकार होते. या राज्यातही होते. पण मुंबईसाठी कोणतीही योजना केली नाही. त्यामुळे मुंबई मागासली. मुंबई म्हणजे प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत, पुढे जाण्याची सवय.पण काँग्रेस भ्रष्टाचार, देशाला मागे ढकलणे, विकासात अडथळे आणणे. हेच काम करतं.
७० लाख रेडी पटरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजनेच्या मदतीने आपला व्यापार वाढवण्यास मदत मिळाली. त्याचा फायदा मुंबईचे १ लाखांहून अधिक जणांना याचा लाभ मिळाला आहे. मुंबईच्या सहकाऱ्याचे आभार मानतो. एक वर्षापूर्वी त्यांच्या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली होती. सेवाभावनेने काम फक्त भाजप आणि महायुतीच करू शकते. नम्रतेने तुम्हाला सांगतो की, तुमचे स्वप्नच आमचा संकल्प आहे,. मोदी तुमच्या स्वप्न जगतात.
तुमच्या स्वप्नांसाठी जागं राहतो. ते पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करण्याची गॅरंटी देतो. मात्र मविआने अटल सेतूला विरोध केला होता. मेट्रोला विरोध केला होता. आम्ही इनोव्हेशन, डिजिटल इंडिया यूपीआय. बद्दल बोलत होतो, तेव्हा हे टीका करत होते. असे लोक मुंबईला कधीच पुढे नेऊ शकत नाही.
मुंबई जोडण्यावर विश्वास ठेवते. पण काँग्रेस आणि आघाडी तोडण्याची भाषा करते. मुंबईत प्रत्येक जातसमूहाचे लोक येतात. एकत्र राहतात. पण महाविकस आघाडीवाले जातीच्या नावावर त्यांच्यात भांडणे लावते.
सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडत आहे. पाण्याविना मासे तडफडतात, तसे एसटी ओबीसी एसटीची एकजूट तोडू पाहत आहेत. म्हणून ते आपापसात त्यांच्यात भांडणे लावतात. मजबूत काँग्रेस होईल. आघाडीचे लोक ज्याप्रकारे कारनामे करत आहेत, तेव्हा एक गोष्ट खूप महत्वाची झाली आहे ती म्हणजे, 'एक है तो सेफ है'.
मुंबईत तर बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचे शहर आहे. स्वाभिमानाचं शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँघ्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.