Assembly Election: निवडणूक आयोगाचा धडाका, नेत्यांची झाडाझडती; आज कोणा-कोणाच्या तपासल्या बॅगा?

Election Commission: निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आले असून नेत्यांची झाडाझडती घेतली जात आहे. प्रचाराला जाणाऱ्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर आणि त्यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
Assembly  Election: निवडणूक आयोगाचा धडाका, नेत्यांची झाडाझडती; आज कोणा-कोणाच्या तपासल्या बॅगा?
Election Commission
Published On

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यावर आलाय. या अंतिम टप्प्यात राजकीय नेत्यांना सभांचा धडाका लावलाय. त्याचवेळी निवडणूक आयोग सुद्धा अॅक्शन मोडवर आले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रचाराला जाणाऱ्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याचा धडाका लाववलाय. मविआचे नेते नाना पटोले, काँग्रेसचे उमेदवार यांच्या बॅगा तपासल्या. या नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, नाना पटोले यांच्याही बँगा निवडणूक आयोगाने तपासल्यात.

निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची बँग तपासल्यानंतर ठाकरेंनी अधिकाऱ्यांना महायुतीच्या नेत्यांच्याही बँगा तपासाव्यात असा सूचना केल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी नेत्यांच्या बँगाची झाडाझडती केलीय. छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीच्या सभेसाठी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा आज बॅग तपासण्यात आलीय.

छत्रपती संभाजीनगर येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार होती. त्या सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदे यांची बँग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली. अधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्यांच्या बॅगा, ब्रीफकेस आणि इतर सामानांची तपासणी केली. तपासणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले.

११ आणि १२ नोव्हेंबरला सभेसाठी गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सामानांची तपासणी निवडणूक आयोगाच्या पथकाकडून करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ समोर आला होता. बॅग तपासण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्याचा क्लास घेतली होता. आपल्यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅग तपासणी करतानाचा व्हिडीओ हवा असं त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले.

त्यानंतर त्यांनी जाहीर सभेतून सरकारवर त्यावरून हल्ला चढवला होता. त्यानंतर निवडणूक अधिकारी अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी बॅगा तपासण्याचा धडाका लावलाय. सर्वच नेते मंडळींच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासल्या जाताहेत. आज आदित्य ठाकरे, नाना पटोले, पंकजा मुंडे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या बॅग निवडणूक आयोगाने तपासल्या.

Assembly  Election: निवडणूक आयोगाचा धडाका, नेत्यांची झाडाझडती; आज कोणा-कोणाच्या तपासल्या बॅगा?
Pankaja Munde : योगींच्या घोषणेला पंकजा मुंडेंचा विरोध, म्हणाल्या माझं राजकारण वेगळं!

या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची बॅग तपासण्यात आलीय. ते तिरोडा गोरेगावचे राष्ट्रवादी शरद पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे याच्या प्रचारार्थ मुढीकोठा येथे सभेसाठी जात होते. तिरोडा येथील हेलिपॅड येथे निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅग तपासण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात विमानतळावर एकनाथ शिंदे यांच्या बॅग तपासण्यात आल्या.

Assembly  Election: निवडणूक आयोगाचा धडाका, नेत्यांची झाडाझडती; आज कोणा-कोणाच्या तपासल्या बॅगा?
Maharashtra Election : भाजपसोबत जाणार का? उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची सर्वत्र चर्चा

मल्लिकार्जुन खरगे

त्र्यंबकेश्वर येथील सभेसाठी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या बॅगा तपासण्यात आल्यात. खरगे हे हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला आले होते. त्यावेळी हेलीपॅडवर आले असतांना निवडणूक आयोगाने त्यांच्या बॅगांची तपासणी केली. नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पंकजा मुंडे

भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरची देखील तपासणी करण्यात आली. सांगलीच्या बेडगमध्ये भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी त्या हेलिकॉप्टरने दाखल झाल्या. यावेळी निवडणूक आयोग पथकाकडून पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची देखील तपासणी करण्यात आली आहे. पंकजा मुंडे या सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडगे येथे हेलिकॉप्टरने आल्या होत्या.

आदित्य ठाकरे

दापोलीत आदित्य ठाकरे यांची सभा होत आहे, या सभेला आले असताना निवडणूक आयोगाने त्यांची बॅग तपासली. हेलिपॅडवरच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.

Assembly  Election: निवडणूक आयोगाचा धडाका, नेत्यांची झाडाझडती; आज कोणा-कोणाच्या तपासल्या बॅगा?
PM Modi: बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं; औरंगाबादच्या नामांतरावरून पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com