विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे बारामतीतील काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. कारण अजित दादांनी केवळ निकालच नव्हे तर थेट मताधिक्यच सांगितलंय.
अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत घरोबा केला आणि सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर लोकसभेत प्रथमच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे गेले.. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचे दिसतंय. त्यानंतर विधानसभेत आता पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे...त्यामुळे शरद पवारांचे डावपेच यंदाही यशस्वी ठरणार की अजित पवारांची बारामतीतील दादागिरी कायम राहणार यासाठी 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागेल.
सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता. या पराभाची सल अजित पवार यांच्या मनात कायम आहे. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत ती सल आणि मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. लोकसभेला बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली. लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून ताईंना मोठ्या संख्येने मतदान केले. बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला. मी तो स्वीकारला, असे अजित पवार म्हणाले. मात्र विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात ते सकारात्मक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.