पराग ढोबळे, साम प्रतिनिधी
राजकारणातील घराणेशाहीवरून भाजप नेते काँग्रेसवर नेहमी टीका करतात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही टीका केलीय. मुलांसाठी तिकीट मागणाऱ्या नेत्यांनाही नितीन गडकरी यांनी खडेबोल सुनावलेत.
आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्राच्या पोटातून मंत्री चालणार नाही. काँग्रेसमध्ये मुलाबाळांना तिकीट देऊन घराणे चालवले जाते त्यावरही टीकास्त्र सोडले. नितीन गडकरी काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांचा प्रचारसभेत बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधीपक्षातील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना जोरदार टोला हाणला. तेच संविधानविरोधी भाजप नसून काँग्रेस आहे. संविधान तोडमोड करण्याचं काम काँग्रेसनेच केलंय, अशी टीका त्यांनी केलीय. भाजप दलितविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो, त्यावरूनही नितीन गडकरींनी टीका केलीय.
काँग्रेसमध्ये मुलाबाळांना तिकीट देऊन घराणे चालवले जाते त्यावरही गडकरींनी टीकास्त्र सोडले. माझा मुलगा बायको राजकारणात नाही. मुलाच्या आई-वडिलांनी नाही तर जनतेने म्हटलं पाहिजे मुलाला टिकीट द्या. उद्या मुलाने म्हटलं बापाला तिकीट द्या, नाहीतर टीव्ही फोडून टाकतो तर हे चालणार नाही. आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्राच्या पोटातून मंत्री चालणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी पदाचा बाशिंग घालून बसलेल्या अनेकांना गडकरींनी खास पद्धतीत सुनावलं. गडकरी म्हणाले एकाने विचारले, अनेक नेते मुख्यमंत्री होत आहेत. मी त्यावर उत्तर दिलं तुम्ही एक चित्रपट बघितला का? थांब टकल्या भांग पाडते. त्या सिनेमांमध्ये केस नसलेला व्यक्ती कंगवा फिरत होता. सध्या अनेक टक्कल वाले कंगवा फिरून राहिले आहे. अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में अशी परिस्थिती नाही. शेवटी मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता करणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
जे नेते आपल्या कामावर निवडून येत नाही, ते जातीच्या ढाली वापरतात. जे काम करतात त्यांना जातीपातीची गोष्ट करण्याची गरज नाही. चांगलं खायचं असेल तर चांगला हॉटेल पाहिजे. चांगला उपचारासाठी चांगला दवाखाना पाहिजे, जोपर्यंत भ्रष्टाचार मुक्त चांगल्या नेत्याला निवडून देणार नाही तोपर्यंत भविष्य बदलू शकत नाही,असंही नितीन गडकरी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.