Sanjay Raut: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तपासणी होत नाही; नेत्यांच्या कारमधून पैशांचं वाटप सुरू, संजय राऊतांचा आरोप

Maharashtra Election: नेत्यांच्या कारमधून पैशांचे वाटप होत आहे. प्रत्येक विभागात 15 15 कोटी रुपये वाटले गेले. लोकसभेच्या वेळेस आमच्याही केल्या आहेत यापुढेही आमच्या करतील. सर्वांना नियम सारखा असेल तर आमची हरकत नाही. पण आमच्याच वाहनांची तपासणी केली जाईल तर गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.
Sanjay Raut:  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तपासणी होत नाही; नेत्यांच्या कारमधून पैशांचं वाटप सुरू, संजय राऊतांचा आरोप
Sanjay RautSaamTV
Published On

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

आम्ही प्रचाराला जातो दौऱ्यावर जातो, आमच्या गाड्या तपासल्या जातात. मोदी, शहा यांची तपासणी केली का? मुख्यमंत्री, गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या तपासण्या होत नाहीत. पोलीस गाडी आणि पोलीस यंत्रणांचा वापर पैसे वाटपासाठी केला जातोय. नेत्यांच्या कारमधून पैशांची वाटप होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

वणी येथे उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या. त्यावरून राज्यातील राजकारण तापलंय. निवडणूक अधिकारी बँगा तपासत असताना उद्धव ठाकरेंनी स्वत: उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ शूट केला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही प्रश्न केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या बँगा तपासल्यानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. नेत्यांच्या गाड्यामधून पैशांची वाटप सुरू असल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय.

Sanjay Raut:  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तपासणी होत नाही; नेत्यांच्या कारमधून पैशांचं वाटप सुरू, संजय राऊतांचा आरोप
Maharashtra Politics: कामाख्या देवीच्या दर्शनासाठी विमानाने गुवाहाटीला जाणार, शहाजी बापूंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

वणीच्या हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यात आल्या. ज्या बॅग तपासण्यावरून गदारोळ सुरू होता त्याचा व्हिडिओ आता समोर आला. या व्हिडिओमधून निवडणूक अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासताना दिसून येत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नाची फायरिंग केली. 'तुम्ही आत्तापर्यंत कधी शिंदेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं समान तपासलं का? मीच पहिला आहे का? मोदी-शहा आले तर त्यांच्या बॅग तपासण्याचा व्हिडिओ मला बनवून पाठवा. मला तुमची नावं सांगा, माझं नाव उद्धव ठाकरे आहे, तुमची नावसुद्धा सांगा, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केले.

काय म्हणाले संजय राऊत

यावरून आता खासदार संजय राऊत यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षांच्याच फक्त बॅगा चेक केल्यास जातात की काय? लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या उतरवलेल्या बॅगांचे चित्रण दाखवलं जात. दोन तासासाठी आलेले एकनाथ शिंदे यांच्या बारा बॅग होत्या. त्यांचे सुरक्षारक्षक व्यवस्थित त्यावेळेला सांभाळत होते.

अनेक गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाला त्यावेळेस दाखवल्या होत्या, पण कारवाई झाली नाही. आम्ही प्रचाराला जातो. दौऱ्यावर जातोय, आमच्या गाड्या तपासल्या जातात. उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणे. मोदी शहा यांची तपासणी केली का?असा संतप्त सवाल करत त्यांनी एक गंभीर आरोप केलाय.

Sanjay Raut:  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तपासणी होत नाही; नेत्यांच्या कारमधून पैशांचं वाटप सुरू, संजय राऊतांचा आरोप
MVA vs BJP manifesto : आश्वासनांचा महापूर, महाविकास आघाडी आणि भाजपच्या जाहिरनाम्यात 'या' मुद्द्यांवरून रस्सीखेच

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तपासण्या होत नाहीत. पोलीस बंदोबस्तामधून या नेत्यांच्या गाड्यातून पैशांचं वाटप सुरू आहे. पोलीस गाडी आणि पोलीस यंत्रणांचा वापर पैसे वाटपासाठी केला जात आहे. मुख्यमंत्री यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवलेल्या 12 बॅगा हा रहस्यमय प्रकार होता. प्रत्येक विभागात 15 15 कोटी रुपये वाटले गेले.

Sanjay Raut:  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तपासणी होत नाही; नेत्यांच्या कारमधून पैशांचं वाटप सुरू, संजय राऊतांचा आरोप
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगांची झडती घेतानाचा VIDEO, शिंदे-फडणवीसांच्या बॅगा तपासल्या का? निवडणूक अधिकाऱ्यांवर संतापले

सांगोल्याचे शहाजीबापू यांच्या गाडीमध्ये 15 कोटी सापडले आणि पाच कोटी दाखवण्यात आले. त्यांचं नाव दाखवलं नाही. हे जे खेळ चालले आहे ते बंद करा अन्यथा आम्हाला आमचा खेळ दाखवावा लागेल. लोकसभेच्या वेळेस आमच्याही केल्या आहेत यापुढेही आमच्या करतील. सर्वांना नियम सारखा असेल तर आमची हरकत नाही. पण केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वाहनांची तपासणी करा असं सांगाच असाल तर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com