Maharashtra Assembly : भाजपच्या १०० नावांवर शिक्कामोर्तब, यादी उद्या येणार, शिंदेंची आज शहांसोबत बैठक!

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जागावाटपावर खलबतं सुरु आहेत. महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे समोर आले. शनिवारी भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam tv
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १०० जागांवर शिक्कामोर्तब केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये बुधवारी अडीच तास बैठक झाली, त्यामध्ये १०० जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीत बैठकीनंतर भाजपच्या वाट्याला आलेल्या उर्वरित जागांवर पक्षाची मंजुरी मिळाल्यावर 90 टक्के जागांची एकत्रित घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज येणार नाही. बुधवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत 100 पेक्षा अधिक नावांवर शिक्कामोर्तब झालेय. महायुतीत बैठकीनंतर भाजपच्या वाट्याला आलेल्या उर्वरित जागांवर पक्षाची मंजुरी मिळाल्यावर 90 टक्के जागांची एकत्रित घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या बाकी जागांवर चर्चा होऊन भाजप अध्यक्ष उर्वरित जागांची नाव निश्चित करणार आहेत.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेवरून काहींच्या पोटात दुखतंय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधांवर निशाणा

शनिवारी भाजपच्या 90 टक्के उमेदवारांची यादी एकत्रित येण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीत अनेक विद्यमान मंत्री आणि काही आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र रिपोर्ट खराब असलेल्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. उर्वरित नावांवर शिक्कामोर्तब करण्या साठी CEC ची बैठक पुन्हा होणार नाही.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आव्हान, म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com