भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी
विधानसभा रणधुमाळी सुरु झालीय. त्यातच दौंड विधानसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. भाजपने विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर माजी आमदार रमेश थोरातांनी भाजपच्या राहुल कुल यांना आव्हान देण्यासाठी पवारांकडे फिल्डिंग लावलीय. मात्र पवारांनी उमेदवारी न दिल्यास थेट अपक्ष लढण्याचा निर्धारही रमेश थोरातांनी केलाय..तर भाजपच्या राहुल कुल यांनी विजयाची हॅट्रिक करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.
राहुल कुल यांनी दौंडमधून सलग 2 वेळा रमेश थोरातांचा पराभव केलाय.. मात्र 2019 च्या निवडणूकीत राहुल कुल हे काठावर पास झाल्याचं चित्र होते. 2019 मधील चित्र कसं होतं? पाहूयात.
राहुल कुल, आमदार, भाजप- 1 लाख 3 हजार 664 मतं
रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस- 1 लाख 2 हजार 918 मतं
राहुल कुल 746 मतांनी विजयी
2019 च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांना मतफुटीचा फटका बसला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. त्यावेळी रमेश थोरातांनी पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने रमेश थोरातांनी पुन्हा पवारांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केलेत. मात्र फक्त थोरातच नाही तर दौंडमधून लढण्यासाठी इच्छुकांची रांगच लागलीय.
राहुल कुल,आमदार, भाजप
रमेश थोरात, इच्छुक, राष्ट्रवादी(SP)/ अपक्ष
आप्पासाहेब पवार, इच्छुक, राष्ट्रवादी (SP)
नामदेव ताकवणे, इच्छुक, राष्ट्रवादी (SP)
लोकसभेला दौंडमधून सुप्रिया सुळेंना तब्बल 26 हजार मतांचं लीड मिळालं. त्यामुळे राहुल कुल यांचं टेंशन वाढलंय. मात्र पवार थोरातांना उमेदवारी देणार की नवा पत्ता टाकणार? यावर कुल यांची हॅट्रिक होणार की नाही? याचं समीकरण अवलंबून असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.