Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : अकाेला लोकसभेसाठी उद्या मतदान, पथके साहित्यासह केंद्राकडे रवाना

अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
maharashtra lok sabha polls 2024 phase 2 tomorrow voting in akola constituency
maharashtra lok sabha polls 2024 phase 2 tomorrow voting in akola constituencySaam Digital
Published On

- अक्षय गवळी

Akola Lok Sabha Election 2024 :

लाेकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या (ता. 26 एप्रिल) पार पडणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानासाठीच्या साहित्याचे वाटप आज (गुरुवार) सकाळपासूनच सुरू करण्यात आले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणाहून मतदान साहित्य घेतल्यानंतर मतदान पथके केंद्रांवर रवाना होऊ लागली आहेत. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

अकोला लोकसभा मतदारसंघात 18 लाख 75 हजार 637 एवढे मतदार आहे. ज्यामध्ये पुरुष मतदार 9 लाख 70 हजार 663 तर महिला मतदार 9 लाख 4 हजार 924 एवढी असणार आहे. इतर 50 इतके आहे. तर 18 ते 19 वयोगटातील 25 हजार 963 मतदार असून ज्यामध्ये 15 हजार 623 पुरष आणि 10 हजार 339 महिला तर 1 इतर मतदार असणार आहे.

maharashtra lok sabha polls 2024 phase 2 tomorrow voting in akola constituency
Nashik Police News : चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, लॅपटॉप, बाईक मिळाल्याने नाशिककर आनंदले

अकोला लोकसभा मतदार संघात एकत्रित 6 विधानसभा आहे. ज्यामध्ये अकोट, बाळापुर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापुर, रिसोड असे सहा विधानसभा आहे. अकोल्यात जवळपास मतदान 2 हजार 56 मतदान केंद्र उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे.

अकोला जिल्ह्यातील 882 ठिकाणी असलेल्या 1 हजार 719 मतदान केंद्रांसाठी तब्बल 5 हजारपेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार. यामध्ये (BSF, RPF, CISF) केरला फोर्स'च्या तुकड्यादेखील तैनात आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सीमांतर्गत 17 स्थिर सर्वेक्षण पथके, 24 भरारी सर्वेक्षण पथके व दोन शीघ्रकृती पथके देखील कार्यरत असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

maharashtra lok sabha polls 2024 phase 2 tomorrow voting in akola constituency
Voter Awareness : मानवी साखळी अन् शेकडोंचा सहभाग; वाशिममध्ये मतदान जागृती, VIDEO

दरम्यान अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कालच अकोला मतदारसंघात निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ धडाडणाऱ्या तोफा थंडावल्या आहे. आता गुपचूप बैठका आणि भेटीगाठी होणार आहे.

maharashtra lok sabha polls 2024 phase 2 tomorrow voting in akola constituency
Sanjaykaka Patil : विशाल पाटलांच्या भानगडी पैलवान चंद्रहार जनतेला सांगतील : संजयकाका पाटील

एकंदरीत आता अकोला लोकसभा मतदारसंघाकड़ं राज्यासह देशाभराचं लक्ष लागून आहे. दिवसेंदिवस अकोला लोकसभा निवडणूक अतिशय रंजक होतांनाच चित्र आहे. दरम्यान आता घोडा मैदान जवळच आहे, मतदारांचा कौल कोणाकड़ं असणार? कोण बाजी मारणार? भाजप आपला विजय रथ कायम ठेवणार, की प्रकाश आंबेडकर अथवा डॉक्टर अभय पाटील भाजपचा विजय रथ रोखण्यात यशस्वी होतील? हे सर्व चित्र आता 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे

Edited By : Siddharth Latkar

maharashtra lok sabha polls 2024 phase 2 tomorrow voting in akola constituency
Ratnagiri Sindhudurg Constituency: एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू, दीपक केसरकर यांच्या बुद्धीची कीव येते : विनायक राऊत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com