- मनोज जयस्वाल
लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वाशिम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम जिल्ह्यामध्ये सुरू आहे. या अंतर्गत आज (मंगळवार) वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका दरम्यान शासकीय कर्मचारी,शिक्षक, शाळेतील विद्यार्थी यांनी मानवी साखळी तयार करुन जागृती केली. (Maharashtra News)
या मानवी साखळीमध्ये लोक कलावंत, राष्ट्रीय छत्र सेनेचे विद्यार्थी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी शहरातील विविध शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी उपस्थितांना 100 टक्के मतदान व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गायकवाड यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वाशिम जिल्ह्यातील सर्व मतदारांनी २६ एप्रिलला मोठ्या संख्येने मतदान करून मतदान टक्केवारीत अव्वल राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी समाज माध्यमातून देखील केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.