Nashik Police News : चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, लॅपटॉप, बाईक मिळाल्याने नाशिककर आनंदले

नाशिकरोड पोलिस ठाण्यात दारणा हॉल मध्ये पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा पोलिस ठाणे हद्दीतील जप्त केलेला एकूण ९५ लाख ३० हजार ६०० रुपयांचे ७५ मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
nashik police returns 95 lakh rs gold laptop bike to citizens
nashik police returns 95 lakh rs gold laptop bike to citizensSaam Digital

- तबरेज शेख

Nashik News :

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सार्थ करीत फिर्यादी यांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाले. नाशिक शहरात चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यासाठी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. परिमंडळ २ अंतर्गत असलेल्या एकूण सहा पोलिस ठाणे हद्दीत ९५ लाख ३० हजार ६०० रुपयांचे ७५ मूळ मालकांना परत करण्यात आला. (Maharashtra News)

नागरिकांची एखादी वस्तू चोरीस गेली की त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. चोरीस गेलेले मुद्देमाल परत मिळणार की नाही याबाबत साशंकता असतेच शिवाय फिर्याद करावी की नाही याबाबत अनेकदा घरच्यांमध्ये दुमत असते.

nashik police returns 95 lakh rs gold laptop bike to citizens
Hanuman Jayanti 2024 : अंजनीपुत्र हनुमान की जय..., शेकडाे भाविकांच्या घोषणांनी दुमदुमली अंजनेरी

अंबड, सातपूर, इंदिरा नगर, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलिस ठाणे हद्दीत चाे-या वाढल्या हाेत्या. यामुळे नागरिक हैराण झाले हाेते. पाेलिसांत सातत्याने चाेरीच्या तक्रारी वाढत हाेत्या. पाेलिसांनी वेगवेगळी पथक स्थापन करुन चाेरट्यांचा तपास केला. यामध्ये सोन्याचे दागिने, मोटार सायकल, टीव्ही, लॅपटॉप, मंदिराची मूर्ती आदी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.

nashik police returns 95 lakh rs gold laptop bike to citizens
Ghati Hospital : घाटी रुग्णालयाचे प्रशासन हादरलं, रेबीजच्या इंजेक्शनमुळे अनेकांना रिएक्शन; अधिष्ठातांच्या तत्परतेने धोका टळला

नाशिकरोड पोलिस ठाण्यात दारणा हॉल मध्ये पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा पोलिस ठाणे हद्दीतील जप्त केलेला एकूण ९५ लाख ३० हजार ६०० रुपयांचे ७५ मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी हे उपस्थित हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे , देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे, इंदिरा नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शर्माळे उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

nashik police returns 95 lakh rs gold laptop bike to citizens
Transgender Wedding : चर्चा आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची; युवकाने तृतीयपंथीयाशी बांधली गाठ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com