Sanjaykaka Patil : विशाल पाटलांच्या भानगडी पैलवान चंद्रहार जनतेला सांगतील : संजयकाका पाटील

Sangli Lok Sabha Election : संजयकाका म्हणाले मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच दिले आहे. विशाल आता पुन्हा मैदानात आलेला आहे.
sanjaykaka patil challenges vishal patil sangli lok sabha election
sanjaykaka patil challenges vishal patil sangli lok sabha electionSaam Digital

Sangli Constituency :

सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय लागली आहे. त्यांनी आमच्यासारख्याची माप काढू नयेत. एकदा तुमच्या भावाचा आणि 2019 ला तुमचा आणि यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करुन हॅट्रिक करणारच असं आव्हान सांगली लोकसभेचे (sangli loksabha election) भाजपा महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (mp sanjaykaka patil) यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील (vishal patil) यांना दिले. यावेळी खासदार पाटील यांनी विशाल याच्यावर खरमरीत टीका करताना त्यांच्या भानगडी पैलवान चंद्रहार पाटील (chandrahar patil) यांच्याकडूनच समजतील असे म्हटले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

संजयकाका म्हणाले मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच दिले आहे. विशाल आता पुन्हा मैदानात आलेला आहे. आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे, पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल.

sanjaykaka patil challenges vishal patil sangli lok sabha election
Satara Constituency: उदयनराजे, शिवेंद्रराजेंचे आव्हान कसं पेलणार? शशिकांत शिंदेंनी हसत हसतच सांगितलं

या माणसाने अनेक सहकारातील संस्था बंद पाडल्या. साखर कारखाने, प्रकाश अ‍ॅग्रो,वसंतदादा दूध संघ,सोनी कारखाना, शाबू प्रकल्प, यासह आठ प्रकल्प बंद पाडले. यात भ्रष्टाचार केला असा आराेप संजयकाका यांनी विशाल पाटील यांच्यावर केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामान्य माणसाला अडचणीत आणून उध्दवस्त केले, त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांना सहकारी संस्थेवरच जगायची सवय आहे,त्यांनी आमची मापे काढू नये, मी खमका माणूस आहे, म्हणूनच एकदा तुमच्या भावाला आणि एकदा तुमचा पराभव केला आहे.

यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करुन हॅट्रिक करणारच असे म्हणत संजयकाका गुंडगिरी करतो की लोकांना दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांना माहित आहे असेही संजयकाका यांनी नमूद केले.

sanjaykaka patil challenges vishal patil sangli lok sabha election
Lok Sabha Election 2024 : कोण मारणार बाजी? लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख जिंका : अंनिसचं आव्हान

विशाल पाटील यांच्या भानगडी हेच पैलवान सांगतील : संजयकाका

विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे या चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केलेल्या आरोपावर मात्र संजयकाकांनी सावधपणे भूमिका मांडली. चंद्रहार बोललेत म्हणजे त्यांना संजय राऊत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून काही मेसेज आले असतील. विशालने काय भानगडी केल्या, काय नाही याबाबत दोन चार दिवसांमध्ये हळूहळू हेच पैलवान आपणाला बऱ्याचशा गोष्टी सांगतील असेही संजयकाका यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

sanjaykaka patil challenges vishal patil sangli lok sabha election
Jyotiba Chaitra Yatra News : चैत्र यात्रा निमित्त कोल्हापुरातून जोतिबा डोंगरावर विशेष बसची सुविधा, लाखाे भाविकांनी डाेंगर फुलू लागला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com