Lok Sabha Election 2024 : कोण मारणार बाजी? लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख जिंका : अंनिसचं आव्हान

हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे असे अंनिसने म्हटले आहे.
predict lok sabha election result accurately win 21 lakh rupees challenges andhashraddha nirmulan samiti
predict lok sabha election result accurately win 21 lakh rupees challenges andhashraddha nirmulan samiti Saam Digital

- अक्षय बडवे

Andhashraddha Nirmulan Samiti News :

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तविल्यास 21 लाख रुपये बक्षीस देण्याचे घाेषित केले आहे. अंनिसचे संघटक मिलींद देशमुख यांनी त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली नुकतीच जाहीर केली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मिलिंद देशमुख म्हणाले सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक राजकीय नेते देखील अंधश्रद्धेला, फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे अज्ञानी आणि भाबडया लोकांत गैरसमज पसरतात. त्यातून अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून 21 लाख जिंकण्याचे आव्हान दिले आहे.

predict lok sabha election result accurately win 21 lakh rupees challenges andhashraddha nirmulan samiti
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

अशी आहे प्रश्नावली

लोकसभा निवडणुकीमध्ये टी. शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मलहोत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील?

कलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदार संघातून कोण विजयी होईल?

वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील?

संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील? कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल?

पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल?

predict lok sabha election result accurately win 21 lakh rupees challenges andhashraddha nirmulan samiti
Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात प्रचाराचा ताेफा आज थंडावणार; अमित शाह, राहूल गांधींच्या सभा

असे हाेता येईल सहभागी

यामध्ये सहभागी हाेण्यासाठी प्रवेशिका, उत्तरासहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या नावे काढलेला रूपये 5000 (रूपये पाच हजार) प्रवेश शुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) सीलबंद पाकीटातून 25 मे 2024 पर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर, सांगली – 416416. फोन नंबर – 0233-2312512 पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर दोन आठवडयाच्या आत परीक्षक समितीच्यावतीने योग्य तो अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल असेही अंनिसने स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

predict lok sabha election result accurately win 21 lakh rupees challenges andhashraddha nirmulan samiti
लाेकसभा निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच समाज माध्यमात 7 ची धूम; 7 टप्पे, 7तारा, 7 मे, 007 उदयनराजे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com