Ratnagiri Sindhudurg Constituency: एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू, दीपक केसरकर यांच्या बुद्धीची कीव येते : विनायक राऊत

Konkan Politics : नारायण राणे आणि दीपक केसरकर व्हॅनिटी व्हन मधून एकत्रित प्रचार करणार हे सिंधुदुर्गचे दुर्देव असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली आहे.
vinayak raut criticizes deepak kesarkar on supporting narayan rane in ratnagiri sindhudurg constituency
vinayak raut criticizes deepak kesarkar on supporting narayan rane in ratnagiri sindhudurg constituency Saam Digital

- विनायक वंजारे

Sindhudurg :

काल परवा पर्यंत दहशतवाद, दादागिरी करणारे नारायण राणे (narayan rane) असा आरोप करणाऱ्या दीपक केसरकर (deepak kesarkar) यांना एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू वाटू लागले. राऊत यांना असं स्वप्न पडलं अशी टीका खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली. दरम्यान नारायण राणे यांच्या बद्धल चुकीचं पसरवणारे हे विनायक राऊतच होते. दीपक केसरकर व नारायण राणे एकत्र आल्यामुळे विनायक राऊत यांची झोप उडाल्याचे आमदार नितेश राणेंनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विनायक राऊत पुढं बाेलताना म्हणाले श्रद्धा आणि सबुरीच प्रतीक असणाऱ्या साई बाबांची भक्ती करणाऱ्या दीपक केसरकर यांच्या वर एवढी आपत्ती येईल, असं वाटलं नव्हतं. त्याच्या कुंडलीत राहू बसला असून एक यज्ञ घाला. दीपक केसरकर यांच्या बुध्दीची कीव येते असंही राऊत यांनी नमूद केले.

vinayak raut criticizes deepak kesarkar on supporting narayan rane in ratnagiri sindhudurg constituency
Sadabhau Khot : राजू शेट्टी सगळ्यांच्या दारात जाऊन आरती करून आले, हातकणंगलेसह काेल्हापूरात महायुती जिंकेल : सदाभाऊ खाेत

राणेंच्या विराेधात केसरकरांची तक्रार

राऊत म्हणाले नारायण राणे यांचा रेडी पोर्ट आहे. तो त्याच्या ताब्यातून काढून सरकारकडे घेण्याची मागणी त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केसरकर यांनी केली होती असा गंभीर आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे.

व्हॅनिटी व्हॅन वरून देखील दीपक केसरकर यांना विनायक राऊत यांनी लक्ष केलं आहे. राणेंसाठी दीपक केसरकर व्हॅनिटी व्हॅन घेऊन प्रचार करत आहेत. राणे आणि केसरकर व्हॅनिटी व्हॅन मधून एकत्रित प्रचार करणार हे सिंधुदुर्गचे दुदैव असल्याची टीका राऊतांनी यावेळी केली आहे.

केसरकर - राणे एकत्र आल्यामुळे विनायक राऊतांची झोप उडाली

विनायक राऊत यांच्या टिकेवर आज नितेश राणे म्हणाले नारायण राणे यांच्याबद्दल चुकीचं पसरवणारा विनायक राऊत हे हाेते. दिपक केसरकर व नारायण राणे एकत्र आल्यामुळे विनायक राऊत यांची झोप उडाली आहे. दिपक केसरकर यांच्या व्हॅनिटी कारला ॲम्बुलन्सचे स्वरूप देऊन विनायक राऊत यांना चार जून नंतर मुंबईला पाठवायचे आहे असे राणेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

vinayak raut criticizes deepak kesarkar on supporting narayan rane in ratnagiri sindhudurg constituency
Lok Sabha Election 2024 : कोण मारणार बाजी? लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख जिंका : अंनिसचं आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com