Loksabha Election 2024: आसामधील अजब-गजब कुटुंब; एकाच कुटुंबात ३५० मतं

Largest Indian Family: भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था आहे. यात मोठी आणि लहान कुटुंब पहायला मिळतात.पण आसाममध्ये एक असं कुटुंब आहे, ज्यात एकाच कुटुंबात तब्बल ३५० मतदार आहेत.या कुटुंबासाठी निवडणुकांचा काळ खूप महत्त्वाचा ठरतो.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Yandex

Largest Family in India: लोकसभा निवडणुक 2024च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत.यादरम्यान ही अनोखी गोष्ट समोर आलीय. आसाममध्ये एका अशा अनोख्या कुटुंबाचा शोध लागलाय. ज्यामध्ये ३५० मतदार असल्याची माहिती मिळत आहे.निवडणुकीच्यादृष्टीने हे कुटुंब अत्यंत महत्त्वाचे आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election: भाजप आमदारांची अग्निपरीक्षा! विधानसभेचे तिकीट पाहिजे तर लोकसभेला लीड द्या; पक्षश्रेष्ठींनी ठेवलं टार्गेट?

२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी आहे.आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील फुलोगुरी नेपाळी पाम येथे रॉन बहादू राहतात. त्यांचं कुटुंब भारतातील सर्वात मोठं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. या कुटुंबातील सर्व सदस्य १९ एप्रिल रोजी सोनितपूर लोकसभा मतदारसंघात मतदान करणार असल्याचे कळतं आहेत.रॉन बहादूर थापा यांना १२ मुले आणि ९ मुली आहेत.रॉन बहादूर यांना ५ बायका होत्या आता १५० हून अधिक नातवंडे आहेत. माहितीनुसार,एकूण १२०० सदस्यांच्या या कुटुंबातील सुमारे ३५० सदस्य लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

https://saamtv.esakal.com/lok-sabha-election/maharashtra-loksabha-election-2024-target-for-bjp-mlas-to-get-a-assembly-ticket-again-gp98

नेपाळी पाम गावचे ग्रामप्रमुख आणि दिवंगत रॉन बहादूर याचा मुलगा तिल बहादूर थापा यांनी त्याच्या कुटुंबाविषयी माहिती दिलीय.त्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात सुमारे ३५० लोक मतदानासाठी पात्र आहेत. यासोबतच त्यांनी सांगितले की त्याला १२ भाऊ आणि ९ बहिणी आहेत.१२ भावांना एकूण ५६ अपत्ये आहेत. रॉन बहादूर थापा यांचे १९९७ मध्ये निधन झाले. दिवंगत रॉन बहादूर थापा यांचा मुलगा तिल बहादूर थापा हे १९८९ पासून गावचे प्रमुख आहेत आणि त्यांना ८ मुलांव्यतिरिक्त ३ मुली आहेत. त्यांचा भाऊ सरकी बहादूर थापा हे ६४ वर्षांचे असून त्यांनी तीन लग्न केलेत, त्यांना १२ मुले आहेत.

मात्र, राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अद्यापही या कुटुंबाला मिळू शकला नाही.तिल बहादूर यांच्या माहितीनुसार,त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेतले पण त्यांना कोणतीही सरकारी नोकरीचा लाभ मिळाला नाही. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य बेंगळुरूमध्ये खासगी नोकरी करत आहेत तर काही मजूर म्हणून काम करतात.

Loksabha Election 2024
Madha Loksabha: माढ्यात मोठ्या घडामोडी! जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे शरद पवारांच्या भेटीला; महायुतीचं टेन्शन वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com