Loksabha Election: भाजप आमदारांची अग्निपरीक्षा! विधानसभेचे तिकीट पाहिजे तर लोकसभेला लीड द्या; पक्षश्रेष्ठींनी ठेवलं टार्गेट?

Maharashtra Loksabha Election 2024: भाजपच्या आमदारांनाही पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. विधानसभेचे तिकीट हवे असल्यास लोकसभेला तालुक्यातू मोठे लीड देण्याच्या सूचना भाजप आमदारांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Politics| BJP|Loksabha Election 2024
Maharashtra Politics| BJP|Loksabha Election 2024SAAM TV

सुरज मासुरकर, मुंबई|ता. १६ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेत राज्यात मिशन ४५ साठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे राज्यात पंतप्रधान मोदी, शहांनी सभांचा धडाका सुरू केला असतानाच आता भाजपच्या आमदारांनाही पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. विधानसभेचे तिकीट हवे असल्यास लोकसभेला तालुक्यातू मोठे लीड देण्याच्या सूचना भाजप आमदारांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीत भाजप आमदारांचे टेन्शन चांगलेच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यामध्ये मिशन ४५ साठी भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते कामाला लागले असतानाच आता हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप आमदारांना अग्नी परीक्षा द्यावी लागणार आहे. खासदार निवडून आणायचा असेल तर प्रत्येक आमदाराला त्याच्या विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्य द्यावे लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ज्यांना पुन्हा आमदारकीचे तिकीट हवंय त्या सर्वांना आपल्या मतदारसंघातून लीड देणे बंधनकारक आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराबाबत कितीही नाराजी असली तरी स्वतःला पुन्हा आमदारकीचे तिकीट मिळावे यासाठी तरी आमदारांनी काम करावे, अशा सुचना भाजप आमदारांना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Politics| BJP|Loksabha Election 2024
Nashik Accident : नातीला शाळेत सोडण्यासाठी निघाले, वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात आजोबा अन् नातीचा मृत्यू

फडणवीसांच्या सभांचा धडाका..

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सभेवर भर देण्यात येत आहे. लोकसभेसाठी एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात १२५ सभांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल घेत असताना फडणवीसांकडून सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Politics| BJP|Loksabha Election 2024
Nashik Accident : नातीला शाळेत सोडण्यासाठी निघाले, वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात आजोबा अन् नातीचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com