Akola News
Akola NewsSaam tv

Akola News : बोटावरची शाई दाखवा आणि करा मोफत हेअरकट; मतदानासाठी अकोल्यात हेअरसलून व्यावसायिकाचा उपक्रम

Akola News : अकोल्यातल्या रामदास पेठ भागात असलेले अनंता कौलकर हेअरसलून सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

अक्षय गवळी 
अकोला
: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती (Akola) केली जात असते. अर्थात आपला हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढावा हा त्यामागील उद्देश असतो. अशाच एका हेअर सलून व्यावसायिकाने मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेत चक्क एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. (Tajya Batmya)

Akola News
Hingoli News : हिंगोली जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा तडाखा; अनेकांचे संसार उघड्यावर

अकोल्यातल्या रामदास पेठ भागात असलेले अनंता कौलकर हेअरसलून सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. अनंताच्या मतदान जनजागृतीच हा उपक्रम नक्कीचं मतदान करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करणार असणार आहे. (election) मतदान करून बोटावरची शाई दाखवा आणि मोफत हेअरकट करा. असं हे अभियान सलून व्यवसायिकांने सुरू केले. या अभियानाची सध्या जिल्हाभरात सर्वत्र चर्चा सुरु असून त्याच्या या अभियानाचे आता सर्वत्र कौतूक होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola News
Sambhajinagar Water Scarcity : टंचाईने वाढली पाण्याच्या टँकरची मागणी; भाव झाले दुप्पट, टँकरसाठी करावी लागतेय वेटिंग

दुकानावर लावले फलक 

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) मतदानाला अद्याप काही दिवस शिल्लक आहे. परंतु सलून व्यावसायिक अनंता कौलकर यांनी मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवा आणि मोफत हेअरकट करून जा; या सुरु केलेल्या अभियानाबाबत आतापासूनच फलकही ठिकठिकाणी दुकानात झळकले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com