Bengaluru Blast: बेंगळुरू कॅफे स्फोटाचं पुणे कनेक्शन? संशयित दहशतवादी शहरात, तपास यंत्रणा अलर्टवर

Bengaluru Blast Pune Connection: बेंगळुरू कॅफे स्फोटाचं पुणे कनेक्शन समोर येत आहे. कॅफे स्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Bengaluru Blast
Bengaluru Blast Saam Tv
Published On

Bengaluru Blast Suspected Terrorists In Pune

बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोटाचतील संशयित दहशतवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास (एनआयए) यंत्रणेला (Bengaluru Blast) आहे. बेंगळुरूमधून बल्लारी आणि तेथून भटकळ, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. (Latest Crime News)

बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत १ मार्च रोजी दुपारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या स्फोटात कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह दहा लोक जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने या बॉम्बस्फोटाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला (Bengaluru Blast Pune Connection) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दशहतवादी पुण्यात आल्याचा संशय

या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतलं गेलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क, टोपी आणि चष्मा घातलेला एक संशयित दहशतवादी कॅफेत प्रवेश करताना आढळून आला ( Suspected Terrorists In Pune) होता. स्फोटकांनी भरलेली पिशवी कॅफेत ठेवून तो तेथून पसार झाला, असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आलं आहे.

स्फोट घडवण्यासाठी टायमरसह आयईडी उपकरण वापरण्यात आलं होतं. स्फोटानंतर संशयित दहशतवादी बेंगळुरूमधून बसने पसार झाला. तो बल्लारी बसस्थानकात उतरला. बल्लारी स्थानकातून तो दुसऱ्या बसने गोकर्णपर्यंत गेला. तेथून तो बसने पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत (Crime News) आहे.

Bengaluru Blast
Bengluru Cafe Bomb Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर, एनआयएने फोटो केला प्रसिद्ध

१० लाखांचं बक्षीस जाहीर

मात्र, तो नक्की पुण्यात आला की दुसऱ्या ठिकाणी गेला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती तपास यंत्रणांनी ‘एनआयए’च्या (NIA) पुणे आणि मुंबईतील पथकांना दिली (Bengaluru Blast Suspected Terrorists) आहे.

बेंगळूर आणि बल्लारी बसस्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. भटकळ आणि गोकर्ण बसस्थानकातील चित्रीकरणाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे. आरोपीची माहिती देणाऱ्यास एनआयएने १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

Bengaluru Blast
Karnataka Bomb Threat : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, कर्नाटकात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com