Bengaluru News: रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणात मोठी अपडेट; चार जणांची चौकशी सुरू

Bengaluru Blast Case: बेंगळुरूमधील १ मार्च रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
Bengaluru News
Bengaluru NewsSaam Tv
Published On

Bengaluru Blast Case Update

बेंगळुरू (Bengaluru News) रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बेंगळुरू शहर आयुक्त बी दयानंद म्हणाले की, शुक्रवारी दुपारी (१ मार्च) आयईडीमुळे झालेल्या रामेश्वरम कॅफे घटनेचा तपास जोरात सुरू आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत मिळालेल्या विविध पुराव्यांनुसार अनेक टीम काम करत आहेत. (Latest Crime News)

या घटनेनंतर राज्यभरात विशेषत: केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कॅफेमध्ये एक बॅग बेवारस अवस्थेत पडलेली (Bengaluru Blast Case) होती. त्यात असलेल्या एका वस्तूचा स्फोट झाला, असं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी वेगात तपास सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट

बेंगळुरूच्या व्हाईटफील्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं (crime news) आहे. या प्रकरणाचा तपास करणारे केंद्रीय गुन्हे शाखेचे अधिकारी धारवाड, हुबळी आणि बेंगळुरू येथून पकडलेल्या चौघांची 'तपशीलवार' चौकशी करत आहेत. पोलीस सूत्रांनी आज ही माहिती दिली.

बेंगळुरू शहर आयुक्त बी दयानंद यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी सुधारित स्फोटक यंत्रामुळे (आयईडी) झालेल्या रामेश्वरम कॅफे घटनेचा तपास जोरात सुरू आहे. ते म्हणाले, 'आतापर्यंत मिळालेल्या विविध संकेतांवर अनेक टीम काम करत (Bengaluru Blast Case Update) आहेत.' दयानंद म्हणाले की, या प्रकरणाची संवेदनशीलता आणि सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांनी अटकळ न घालण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत.

Bengaluru News
Nagpur Crime News : अमित शहांच्या नावाचा गैरवापर करत व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा; नागपुरमधील खळबळजनक घटना

सुरक्षा व्यवस्था कडक

या घटनेनंतर राज्यभरात विशेषत: केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली (Bengaluru Blast) आहे. बेंगळुरू पोलिसांनी कॅफे स्फोट प्रकरणी कठोर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Bengaluru News
Firecracker Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com