Pune Blast News: पुण्यात इलेक्ट्रिक दुकानात स्फोट! ATS कडून तपास सुरु; काय आहे प्रकरण?

स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते.
Pune Blast News
Pune Blast NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News: पुणे शहरातील सहकारनगरमध्ये शनिवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात एक स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. यामध्ये दोन जण जखमीही झाले असून उपचाराकरीता त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, या स्फोटाबद्दल आता मोठी माहिती समोर येत असून स्फोटांत झालेलं नुकसान पाहता संशय आल्याने एटीएसने या बाबतचा तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

Pune Blast News
Pune News: PMPML ची नवी बससेवा! आता AC बसमधून आरामात करा 'पुणे दर्शन'; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरात सोमवारी पहाटे तीन वाजता टीव्हीचा स्फ़ोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. मात्र स्फोटांत झालेल नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू केला आहे.

याशिवाय घटनास्थळावरील तीन दुकानांध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. टीव्हीच्या स्फोटमध्ये इतके नुकसान कसे होऊ शकते? याबाबत तपास यंत्रणांना संशय आला. ज्यामुळे एटीएसकडून (ATS) सविस्तर तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Pune Blast News
Yavatmal News: थाटामाटात लग्न लागलं, वऱ्हाडी मंडळी जेवायला बसले; तितक्याच मधमाशांनी हल्ला केला अन्...

दरम्यान, स्फोट झालेल्या सहकार नगरमध्ये होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व आणि मोबाईल शॉपी अशी दुकाने आहेत. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तू होत्या, अशीही माहिती समोर आली आहे. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com