Yavatmal News: थाटामाटात लग्न लागलं, वऱ्हाडी मंडळी जेवायला बसले; तितक्याच मधमाशांनी हल्ला केला अन्...

Latest News: ही घटना यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिराजवळ घडली आहे.
Yavatmal News
Yavatmal News Saam Tv

संजय राठोड, यवतमाळ

Yavatmal News: यवतमाळमध्ये (Yavatmal) लग्नाला (Marriage) आलेल्या पाहुण्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 2 लहान मुलांसह 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी काही जण जंगलात पळाले. ही घटना यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिराजवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिराजवळ लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नसोहळ्याला नवरी आणि नवऱ्याकडील पाहुणे मोठ्यासंख्येने आले होते. मोठ्या थाटामाटत लग्न लागले त्यानंतर सर्व पाहुणे जेवायला बसले आणि त्याच दरम्यान पाहुण्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यामुळे लग्न स्थळावर एकच गोंधळ उडाला. सर्व वऱ्हाडी मंडळी इकडे तिकडे पळू लागले.

Yavatmal News
Viral Video: चालू गाडीवर पोरींनी केला प्रताप! घट्ट मिठी, किसिंग अन् जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी संतापले

मधमाशांच्या हल्ल्यानंतर नवरा आणि नवरीकडच्या पाहुण्यांची धावपळ झाली. अनेकांनी बचाव करण्यासाठी नाल्याच्या पाण्यात उड्या मारल्या. तर काही जण जंगलामध्ये पळाले. लग्नमंडपात वऱ्हाडी मंडळी जेवायला बसले असतानाच हा हल्ला झाल्यामुळे सर्वजण पळू लागले. त्यामुळे अन्नाची नासाडी झाली. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 50 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांसह अनेक महिलांचा समावेश आहे.

या मधमाशांमुळे गावामध्ये दहशत निर्माण झाली आहे. गावामध्ये लग्नाला आलेल्या पाहुणांनी मोठी गर्दी केली आहे. या लग्नासाठी मुंबईवरुन काही जण आले होते. ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. आगी मोहोळ मधमाशांच्या पोळाला कोणीतरी दगड मारल्यामुळे मधमाशांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com