Pune PMPL News
Pune PMPL NewsSaamtv

Pune News: PMPML ची नवी बससेवा! आता AC बसमधून आरामात करा 'पुणे दर्शन'; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर...

Pune Darshan Bus Service: पुणेकरांसाठी खुशखबर! प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही विशेष बससेवा सुरू राहणार आहे.

Pune PMPL Special Tourist Bus Service: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) येत्या एक मे पासून पुणे शहर व परिसरातील पर्यटन व धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी सात विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही विशेष बससेवा सुरू राहणार आहे. पर्यटन सेवेसाठी वातानुकुलित ई-बस वापरल्या जाणार आहेत.

Pune PMPL News
PMC Budget 2023: पुणे मनपा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा! PMPL साठी ४७० कोटींची तरतूद; ८ नवे उड्डाणपुल होणार

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. तसेच शनिवारी, रविवारी नोकरदारांनाही सुट्टी असते. त्यामुळे फिरायला कुठे जायचं असा प्रश्न पडतोच. आता पुणेकरांच्या या समस्येचा पुणे शहर परिवहन महामंडळाने उत्तम पर्याय शोधला आहे. पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.

पुणे (Pune) शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल (PMPML) खास पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. या बस शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सुरू असणार आहेत. या प्रवासाठी प्रत्येकी प्रत्येक मार्गावर वेगवेगळे दर असतील. (Latest Marathi News)

Pune PMPL News
Devendra Fadnavis News: कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार; फडणवीस छातीठोकपणे म्हणाले, 'गरीबांसाठी दिल्लीतून...'

मार्ग क्र- 1

बस सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ

हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग क्र. 2

बस सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ

हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग क्रं. 3

बस सुटण्याचे ठिकाण : डेक्कन जिमखाना

डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग क्रं. 4

बस सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक

पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग क्रं. 5

बस सुटण्याचे ठिकाण पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक

पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन

तिकीट दर- 700 रुपये प्रति प्रवासी

Pune PMPL News
Pune News: पुण्यात अवैध बांधकामावर मनपाचा हातोडा, ५ मजली इमारत जमिनदोस्त

मार्ग क्रं. 6

बस सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक

पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली). वाडेबोल्हाई छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग क्रंं. 7 -

बस सुटण्याचे ठिकाण : निगडी भक्ती शक्ती बसस्थानक

भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसार्वी मंदिर (चिंचवडू), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गांथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी

तिकीट दर- 700 रुपये प्रति प्रवासी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com