Karnataka Bomb Threat : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, कर्नाटकात खळबळ

Karnataka Bomb Threat News in Marathi : कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटक सरकारला ईमेलद्वारे सोमवारी दुपारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या ईमेलनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे
Karnataka Bomb Threat
Karnataka Bomb ThreatSaam tv
Published On

Karnataka threaten Calls :

कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटक सरकारला ईमेलद्वारे सोमवारी दुपारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. कर्नाटक सरकारला दुपारी २.४८ वाजण्याच्या सुमारास ईमेल मिळाला. या ईमेलनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारमधील मुख्यमंत्री सिद्धारमैया, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्र्यांना ईमेलद्वारे बेंगळुरू शहर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव शाहिद खान असल्याचे समजत आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने २.५ मिलियन्स डॉलरची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे.

Karnataka Bomb Threat
Rajasthan paper leak: पेपर लीक, डमी उमेदवार...५० 'मुन्नाभाई' झाले उपनिरीक्षक, टॉपर पोलिसांच्या जाळ्यात

या ईमेलमध्ये ट्रेन, मंदिर,हॉटेल आणि अंबारी उत्सवात बॉम्ब ठेवल्याचा दावा ईमेलमध्ये करण्यात आला आहे. बेंगळुरू शहराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Karnataka Bomb Threat
Bengaluru Crime News : Anniversaryचं गिफ्ट न मिळाल्याने पत्नीने पतीला चाकूने भोसकलं; घटनेनं बेंगळुरू हादरलं

या प्रकरणी सायबर क्राइम स्टेशनमध्ये एफआयआर नोंद करण्यात आल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. बेंगळुरू सायबर क्राइम पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. या धमकीनंतर कर्नाटकात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com