Rajasthan paper leak: पेपर लीक, डमी उमेदवार...५० 'मुन्नाभाई' झाले उपनिरीक्षक, टॉपर पोलिसांच्या जाळ्यात

Rajasthan paper leak Update : राजस्थानमधून पेपर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेपर लीक प्रकरणी ट्रेनिंग घेणाऱ्या आरोपी उपनिरीक्षकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
exam paper Leak in beed
exam paper Leak in beed saam tv
Published On

Rajasthan paper leak News :

राजस्थानमधून पेपर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेपर लीक प्रकरणी ट्रेनिंग घेणाऱ्या आरोपी उपनिरीक्षकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या प्रकरणात परीक्षेतील टॉपरच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

'आजतक'च्या वृत्तानुसार, स्पर्धा परीक्षा पेपर लीक प्रकरणी पोलिसांनी (Police) ३५ नव्या आरोपींना पोलीस ट्रेनिंग सेंटरमधून पळून जाण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. पोलिसांनी यापैकी १५ पैकी १३ जणांना ताब्यात घेतलं आहे. राजस्थान सरकार या उमेदवारांना बडतर्फ करणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

exam paper Leak in beed
Karnataka Bomb Threat : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, कर्नाटकात खळबळ

राजस्थान पेपर लीक प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्पर्धा परीक्षेत टॉप करणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या उमेदवाराला पोलिसांनी पेपर लीक प्रकरणी आणि परीक्षा पास होण्यासाठी डमी उमेदवाराचा उपयोग केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांचं (Rajasthan Police) विशेष पथक हे पोलीस अकॅडमीत पोहोचलं. त्यानंतर प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना ताब्यात घेतलं. तसेच अजमेरच्या किशनगडमधील पोलीस ट्रेनिंग सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

राजस्थानचे पोलीस एटीएस आणि एसओजीचे एडीजी वी के सिंह यांनी म्हटलं की, राजस्थान लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक आणि प्लाटून कमांडर भरती परीक्षा ( २०२१) आयोजित केली होती. पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, 'एका टोळीने परीक्षेचा पेपर लीक केला. तसेच काही उमेदवारांची भरती केली होती. पोलिसांकडून या प्रकरणी एफआयर नोंद करण्यात आला आहे.

exam paper Leak in beed
Gujarat Politics : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; गुजरातच्या बड्या नेत्यांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

या प्रकरणी पोलिसांनी प्रशिक्षण घेणाऱ्या १५ उमेदवारांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना चौकशीसाठी एसओजी मुख्यालयात चौकशी आणण्यात आलं आहे. या प्रकरणात पेपर लीकसहित परीक्षेसाठी डमी उमेदवारांचाही पुरवठा करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आलं आहे. तसेच परीक्षेसाठी पात्रता नसणाऱ्या उमेदवारांचीही परीक्षा देण्यासाठी सोय करण्यात आली होती, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com