congress is bjp b team says vanchit bahujan aghadi leader sujat ambedkar
congress is bjp b team says vanchit bahujan aghadi leader sujat ambedkar Saam Digital

Sujat Ambedkar: काँग्रेस हीच भाजपची बी टीम : सुजात आंबेडकर

बाळासाहेब आंबेडकरांनी तीन ते चार वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दोन पत्र लिहिली, इंडिया आघाडीला आपण खुले पत्रही लिहिलं होतं. जर बी टीम असतो तर पत्र लिहिलं असतं का असा सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला.

- मनोज जयस्वाल

Washim :

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (vanchit bahujan aghadi leader sujat ambedkar) यांनी काँग्रेस हीच भाजपची बी टीम असल्याचा खळबळजनक आरोप वाशिम मध्ये बोलताना केला. समनक जनता पार्टीचे (samnak janta party) उमेदवार प्राध्यापक अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ उकळीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुजात आंबेडकर बाेलत हाेते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सुजात आंबेडकर म्हणाले ज्या काँग्रेसने भंडाऱ्यात बाबासाहेबांना त्रास दिला त्याच काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना त्रास दिला. आता अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाडण्यासाठी एकमेव बौद्ध उमेदवार उभा केला आहे असेही त्यांनी नमूद केले.

congress is bjp b team says vanchit bahujan aghadi leader sujat ambedkar
Sangamner Hanuman Jayanti 2024 : संगमनेरमध्ये महिलांनी ओढला हनुमान रथ, महिलांच्या पराक्रमाची साक्ष

काँग्रेसने भैया साहेबांना नांदेडमध्ये त्रास दिला. ह्या काँग्रेसने बाळासाहेबांना अकोल्यामध्ये त्रास दिला आणि 2024 च्या निवडणुकीत हीच काँग्रेस आनंदराज आंबेडकर यांना अमरावती मध्ये त्रास देत आहेत. या परिस्थितीत आपण काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही. काँग्रेस हीच भाजपची खरी बी टीम आहे असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुजात पुढे म्हणाले बाळासाहेब आंबेडकरांनी तीन ते चार वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दोन पत्र लिहिली, इंडिया आघाडीला आपण खुले पत्रही लिहिलं होतं. जर बी टीम असतो तर पत्र लिहिलं असतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Edited By : Siddharth Latkar

congress is bjp b team says vanchit bahujan aghadi leader sujat ambedkar
Jyotiba Chaitra Yatra News : चैत्र यात्रा निमित्त कोल्हापुरातून जोतिबा डोंगरावर विशेष बसची सुविधा, लाखाे भाविकांनी डाेंगर फुलू लागला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com