Yoga For Anxiety : थकवा आणि तणावमुक्तीसाठी करा ही योगासने, वाचा सविस्तर

Yoga Tips : आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्यायाम आणि योगासने करतात, परंतु जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या निरोगी नाही तोपर्यंत या व्यायामांचा काहीच उपयोग नाही. ताणतणावातून आराम मिळवण्यासाठी योगासने अतिशय प्रभावी आणि आरामदायी मानली जातात.
Yoga For Anxiety
Yoga For AnxietySaam Tv
Published On

Yoga For Stress :

आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्यायाम आणि योगासने करतात, परंतु जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या निरोगी नाही तोपर्यंत या व्यायामांचा काहीच उपयोग नाही. योग आणि वेलनेसचे तज्ज्ञ सांगतात की, अशी 5 योगासने आहेत जी तणाव दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ताणतणावातून आराम मिळवण्यासाठी योगासने अतिशय प्रभावी आणि आरामदायी मानली जातात. योगासने केल्याने मानसिक शांती ( Peace Of Mind) मिळते आणि शरीर अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहते. चला जाणून घेऊया काही योगासनांविषयी जे तणाव (Stress) दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत.

अनुलोम विलोम -

हा प्राणायाम करण्यासाठी पाठ सरळ करून बसा. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि नंतर उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. तुम्ही हे 2 ते 5 मिनिटांसाठी करू शकता.

Yoga For Anxiety
Yoga Tips : दिवसभर काहीही खाल्ल्यानंतर संध्याकाळी योगा करणे योग्य की, अयोग्य? जाणून घ्या

बालासन -

बालासन करण्यासाठी, गुडघे वाकवून बसा आणि आपले हात शक्य तितके पुढे ओढा. हे आसन करणे खूप सोपे आणि फायदेशीर आहे. हे 5 मिनिटांसाठी करा.

मार्जरियासन -

यामध्ये, गुडघ्यावर बसतो आणि पाठीमागे वाकतो. श्वास घेताना पोट हळूहळू आत सोडा आणि नंतर हळूहळू बाहेर सोडा. त्यामुळे मन पूर्णपणे शांत होते.

Yoga For Anxiety
Yoga For Thyroid: दररोज नियमित करा ही योगासने, Thyroidपासून होईल लवकरच सुटका

पश्चिमोत्तानासन -

यामध्ये, पाय आणि पाठ पूर्णपणे सरळ ठेवा. आता आपले हात पायांपासून पुढे खेचा. डोके खाली वाकवा, नंतर हळूहळू हात सामान्य स्थितीत आणा.

शवासन -

या आसनात आरामात झोपा आणि शरीर पूर्णपणे सैल सोडा. या आसनाने सर्व तणाव दूर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com