Yoga For Thyroid: दररोज नियमित करा ही योगासने, Thyroidपासून होईल लवकरच सुटका

Yoga Tips For Thyroid problem : डायबेटिजप्रमाणे थायरॉईडनेही महामारीचे स्वरूप धारण केले आहे. हा आजार बहुधा स्त्रियांमध्ये दिसून येतो. मात्र नियमित योगासने केल्यास हा धोकादायक आजार आटोक्यात येऊ शकतो.
Yoga Exercises for Thyroid problem
Yoga Exercises for Thyroid problemSaam Tv
Published On

Yoga Exercises For Thyroid problem:

डायबेटिजप्रमाणे थायरॉईडनेही महामारीचे स्वरूप धारण केले आहे. हा आजार बहुधा स्त्रियांमध्ये दिसून येतो. मात्र नियमित योगासने केल्यास हा धोकादायक आजार आटोक्यात येऊ शकतो. या आजारापासून आराम मिळवण्यासाठी कोणते आसन केल्याने तुम्ही हे देखील जाणून घेतले पाहिजे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थायरॉईडची समस्या प्राणायाम आणि योगासने मुळापासून दूर केली जाऊ शकते. थायरॉईड हा एक आजार (Disease) आहे जो बहुतेक महिलांमध्ये आढळतो. तज्ज्ञांच्या मते, थायरॉईडची समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये 10 पटीने जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, प्राणायाम आणि योगाद्वारे थायरॉईडला त्याच्या मुळापासून सहज काढता येऊ शकते.

Yoga Exercises for Thyroid problem
Realtionship Tips: साखरपूडा झाल्यानंतर मुला-मुलींनी या चुका करूच नका, अन्यथा...

थायरॉईडपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा योग फायदेशीर आहे

थायरॉईडपासून मुक्ती मिळवण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहे. असे केल्याने संपूर्ण शरीर एनर्जीने भरलेले राहते. याशिवाय, हे केवळ हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंड निरोगी (Healthy) ठेवण्यास मदत करत नाही तर थायरॉईडपासून आराम देखील देते.

Yoga Exercises for Thyroid problem
Yoga Tips For Children : मूलं दिवसातून चार-पाच तास अभ्यास करतात? मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ही योगासने ठरतील फायदेशीर

भस्त्रिका

हा प्राणायाम तीन प्रकारे केला जातो. प्रथम पाच सेकंद श्वास घ्या आणि पाच सेकंदांसाठी श्वास सोडा. दुसऱ्यामध्ये अडीच सेकंद श्वास घ्या आणि अडीच सेकंद श्वास सोडा. तिसरे, श्वास घ्या आणि वेगाने श्वास सोडा. हा प्राणायाम सतत पाच मिनिटे करा. हे आसन दररोज 5-10 मिनिटे करा.

कपालभाती

योग तज्ञांच्या मते, कपालभाती केल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. याने शरीरातील अशुद्ध घटक बाहेर काढले जातात. यामुळे थायरॉईडपासून आराम मिळतो.

Yoga Exercises for Thyroid problem
Yoga In Winter Season : हिवाळ्यात हात-पाय दुखतायत? ही योगासने दररोज नियमित करा, लगेच मिळेल आराम

उज्जयी

या आसनात, घशातून श्वास घेऊन ओमचा उच्चार केला जातो. थायरॉईडला याचा खूप फायदा होतो. हा साधा व्यायाम नियमितपणे 7-11 वेळा केला पाहिजे.

अनुलोम-विलोम

अनुलोम-विलोम करण्‍यासाठी, सर्वप्रथम पद्माशन आसनात बसा. आता उजव्या हाताची अनामिका आणि सर्वात लहान बोट एकत्र ठेवा आणि डाव्या नाकावर ठेवा आणि उजव्या नाकावर अंगठा ठेवा. तर्जनी आणि मधली बोटे एकत्र फोल्ड करा. आता डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि अंगठा काढून उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. हे आसन 15 मिनिटे ते अर्धा तास करा. थायरॉईडसाठी हे फायदेशीर (Benefits) ठरेल.

Yoga Exercises for Thyroid problem
Yoga Tips For Shoulder Pain : दिवसभर बसून काम केल्याने दुखतोय खांदा? नियमित करा हलासन, आरोग्यालाही मिळेल फायदा

सिंहासन

हे आसन थायरॉईडसाठी सर्वोत्तम मानले जाते. हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय समोर उभे करून बसा. आता तुमचा उजवा पाय वाकवून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि डावा पाय वाकवून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. यानंतर, पुढे झुका. दोन्ही गुडघ्यांवर विश्रांती घेताना, आपले हात सरळ करा आणि जमिनीवर ठेवा. यानंतर, शरीराचा वरचा भाग पुढे खेचा. तोंड उघडा आणि जीभ तोंडातून बाहेर काढा. नाकातून श्वास घेताना तोंडातून आवाज काढा. हे दररोज 7-11 वेळा करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com