आजची मुलं खरंच “ऐकत नाहीत” की आपण त्यांना समजूनच घेत नाही? मानसशास्त्र काय सांगतं?

Neuroscience Behind Teenage Behavior And Attention Issues: आजच्या मुलांच्या वर्तनामागे केवळ हट्टीपणा नसून मेंदू विकास, डिजिटल ओव्हरस्टिम्युलेशन आणि भावनिक तुटलेपण यांसारखी कारणे आहेत.
“When silence looks like disobedience, it may actually be a cry for understanding.”
“When silence looks like disobedience, it may actually be a cry for understanding.”Saam tv
Published On

डॉ. कविता गडदे, क्लिनिकल सायको-ऑन्कोलॉजिस्ट

आजच्या युगामध्ये तेरा-चौदा वर्षांच्या मुलांबद्दल पालकांकडून वारंवार तक्रारी ऐकायला मिळतात —“मुलं ऐकत नाहीत”, “अभ्यासात लक्ष नाही”, “लिहायला आवडत नाही”, “सतत मोबाईलवर असतात”, “एकटे राहतात”…परंतु प्रश्न असा आहे की ही मुलं खरोखर “न ऐकणारी” आहेत का? की आपण त्यांच्या बदललेल्या मनोविश्वाला समजून घेण्यात कमी पडतो आहोत? जर आपण या प्रश्नाकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर काही महत्त्वाचे मानसशास्त्रीय आणि न्यूरोसायन्सशी संबंधित घटक समोर येतात.

“When silence looks like disobedience, it may actually be a cry for understanding.”
Back Pain Causes: सतत पाठदुखी होते? दुर्लक्ष करू नका, ही 5 कारणं ठरू शकतात धोकादायक

१. मेंदूचा विकास: निर्णयक्षमता अजून विकसित होत आहे

या वयात मुलांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स , जो निर्णय घेणं, नियोजन आणि शिस्त यासाठी जबाबदार असतो — पूर्ण विकसित झालेला नसतो. परंतु लिम्बिक सिस्टीम — जी भावना आणि त्वरित आनंदाशी संबंधित आहे ती खूप सक्रिय असते. यामुळे मुलांना इन्स्टंट रिवॉर्ड (मोबाईल, गेम्स) जास्त आकर्षक वाटतात, आणि दीर्घकालीन उद्दिष्ट (अभ्यास) कमी महत्त्वाचं वाटतं.

“When silence looks like disobedience, it may actually be a cry for understanding.”
Summer Health Care: कडक उन्हामुळे त्रास होतोय? सतत आजारी पडताय? 'हे' उपाय ठरतील रामबाण इलाज

२. डोपामाइन आणि डिजिटल ओव्हरस्टिम्युलेशन

मोबाईल, रील्स, गेम्स सतत मेंदूला डोपामाइनचा “डोस” देत असतात.

यामुळे:

• अभ्यास “बोरिंग” वाटतो

• लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते

• मेंदूला इन्स्टंट रिवॉर्डची सवय लागते

“When silence looks like disobedience, it may actually be a cry for understanding.”
Unmarried health risks: अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

३. शिक्षण पद्धतीतील मिसमॅच

आजची मुलं व्हिज्युअल, इंटरॅक्टिव्ह आणि फास्ट-पेस लर्निंगला सरावलेली आहेत.

पण शिक्षण पद्धती अजूनही रट्टाळ आणि एकसुरी आहे.

हा mismatch मुलांच्या इंटरेस्टमध्ये घट निर्माण करतो.

४. भावनिक घटक: दिसतं हट्टीपणा, आत असते भीती

“When silence looks like disobedience, it may actually be a cry for understanding.”
Liver pain symptoms: लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात नेमक्या कुठे होतात वेदना? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

४. भावनिक घटक: दिसतं हट्टीपणा, आत असते भीती

बर्‍याच मुलांमध्ये दिसणाऱ्या समस्या:

• Anxiety

• Low self-esteem

• Comparison pressure

• Failure fear

बाहेरून हट्टीपणा दिसतो, पण आतून असुरक्षितता आणि भीती असते.

५. कौटुंबिक आणि सामाजिक बदल

• पालकांचा व्यस्त दिनक्रम

• क्वालिटी टाइमची कमतरता

• जजमेंटल संवाद

• सतत तुलना

यामुळे मुलं आयसोलेट होतात आणि मोबाईलमध्ये comfort शोधतात.

६. हिडन लर्निंग इश्यूज

IQ नॉर्मल असूनही खालील अडचणी असू शकतात:

• Attention difficulties (ADHD traits)

• Specific Learning Difficulties

• Executive Functioning issues

म्हणून ही “न ऐकणारी” मुलं नसून : Disconnection, Overstimulation आणि Emotional confusion अनुभवणारी मुलं आहेत.

उपाययोजना: मल्टिलेव्हल अप्रोच आवश्यक

घरच्या पातळीवर

• आदेशाऐवजी संवाद (Connection over Command)

• मोबाईलवर बंदी नाही, पण structured use

• दररोज 20–30 मिनिटं non-judgmental संवाद

शाळेच्या पातळीवर

• Experiential learning

• Life skills आणि emotional education

• Attention-building activities

क्लिनिकल पातळीवर

• Psychological screening (attention, emotion, motivation)

• Cognitive-Behavioral strategies

• Parent training modules

• Neuro-psychology integration

निष्कर्ष:

ही समस्या “डिसिप्लिनची” नाही आहे ,

ती आहे Attention, Emotion आणि Environment mismatch ची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com