Summer Health Care: कडक उन्हामुळे त्रास होतोय? सतत आजारी पडताय? 'हे' उपाय ठरतील रामबाण इलाज

Shruti Vilas Kadam

डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता)

उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. यासाठी भरपूर पाणी, नारळपाणी आणि लिंबूपाणी पिणे आवश्यक आहे.

Summer Health Care Tips | Pintrest

उष्माघात (Heatstroke) होण्याचा धोका

अतिउष्णतेमुळे चक्कर, उलटी, डोकेदुखी होऊ शकते. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे आणि डोक्यावर टोपी किंवा कॅप वापरावी.

summer health tips | google

त्वचेचे नुकसान (Sunburn)

जास्त उन्हात राहिल्याने त्वचा जळते आणि काळी पडते. बाहेर जाताना सनस्क्रीन, सनग्लासेस आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत.

summer health tips | GOOGLE

थकवा आणि अशक्तपणा

उष्णतेमुळे शरीर लवकर थकते. हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा, तसेच पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे.

Weakness | yandex

डोळ्यांचे त्रास

कडक उन्हामुळे डोळ्यांना जळजळ किंवा कोरडेपणा जाणवतो. सनग्लासेस वापरणे आणि डोळ्यांना थंड पाण्याने धुणे फायदेशीर ठरते.

Summer Hair Care Tips

अन्न खराब होण्याची शक्यता

उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होते, ज्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. ताजे आणि स्वच्छ अन्नच खावे.

food | yandex

काळजी घेण्याचे उपाय (Prevention Tips)

हलके, सैल कपडे घालावेत, भरपूर पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपी वापरावी आणि शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे.

Summer Health Care Tip | Saam Tv

Sabja Water Benefits: उन्हाळ्यात सब्जाचे पाणी प्यायल्याने मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Sabja Seeds in Water | Saam Tv
.येथे क्लिक करा