

सध्या लोक एका जागी बसून काम करणं जास्त पसंत करतात. सतत चालणं, फिरणं अनेकांना कंटाळवाणं वाटतं. कामाच्या ठिकाणी बऱ्याचदा एक खुर्ची असते आणि समोर डेस्क असतो. दिवसभर म्हणजे किमान ९ तास तरी आपल्याला एकाच जागी बसून काम करावं लागतं. याने पाठीला मोठ्या दुखण्याला सामोरं जावं लागतं. तरुणपणातच अनेकांना पाठीच्या दुखण्याला सामोरं जावं लागतं. पण हे दुखणं बऱ्याचदा एका जागी बसून होतं असं नाही. यामागे अनेक कारणं असतात. जर तुम्ही ही समस्या किंवा वेदना नेहमीची म्हणून दुर्लक्षित करत असाल तर पुढील माहिती एकदा वाचाच. त्याने तुमच्या मनातील संभ्रम दूर होईल आणि तुम्हाला नेमकं कारण सुद्धा कळेल.
आजकाल अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो आणि तो साधा स्नायू ताण समजून दुर्लक्ष केलं जातं. मात्र तज्ञांच्या मते, लोअर बॅक पेनमागे काही गंभीर कारणंही असू शकतात. पुढील माहितीत आपण पाठ दुखीची महत्वाची कारणे जाणून घेणार आहोत. ज्याने भविष्यातला धोका टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल.
पाठीच्या कण्याची समस्या (Disc Problems)
मणक्यांमधले डिस्क सुजणे किंवा सरकणे यामुळे तुम्हाला लोअर बॅक पेन होऊ शकतं. यामुळे सायटिका सारखी समस्या निर्माण होऊन पायात झिणझिण्या किंवा कमजोरी सुद्धा जाणवते.
स्पाइनल फ्रॅक्चर ( Spinal Fractures)
मणक्यात असणारे सूक्ष्म तडे किंवा कंप्रेशन फ्रॅक्चर हालचालींनी वाढणारी वेदना देतात. यामध्ये ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं कमजोर होऊन साध्या हालचालींनीही फ्रॅक्चर होऊ शकतात.
संरचनात्मक बदल (Structural Issues)
स्पाइनल स्टेनोसिस किंवा स्कोलिओसिसमुळे मणक्यांची रचना बदलते. त्याने नसांवर दाब येऊन चालताना पाठ दुखते, कळा आणि पोस्चर बिघतं.
संधिवात (Arthritis)
ऑस्टिओआर्थरायटिसमुळे कूर्चा झिजून पाठ कडक होते आणि दुखणं वाढतं. अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये मणके जुळून पाठ ताठ राहण्याचा धोका जास्त असतो.
इन्फेक्शन आणि ट्यूमर
बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मणक्यांमध्ये सूज आणि सतत वेदना होऊ शकते. काही ट्यूमर रात्री पाठीचं दुखणं वाढतं, त्यामुळे वेळेत तपासणी महत्त्वाची आहे.
किडनी स्टोन
किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात. यासोबत उलटी सारखं वाटणं, लघवीतून रक्त आणि वारंवार लघवीची लक्षणं दिसतात. त्यामुळे पाठदुखी साधी समजून दुर्लक्ष करू नका. सतत वेदना जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.