Alcohol tolerance difference: पुरुषांपेक्षा महिलांना दारू लगेच का चढते? जाणून घ्या यामागचं सायन्स

Alcohol affects women faster than men science: दारूचे सेवन केल्यावर महिलांना पुरुषांपेक्षा लवकर परिणाम जाणवतो. हे फक्त सहनशक्तीचे कारण नसून यामागे जैविक आणि वैज्ञानिक कारणे आहेत
Alcohol tolerance difference
Alcohol tolerance differencesaam tv
Published On

मद्यपान करणं प्रत्येकाच्या आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. जास्त प्रमाणात दारूचं सेवन केल्याने तुमच्या लिव्हरमवर विपरीत परिणाम होतो. दारूचा नशा होतो म्हणजेच दारू अधिक चढते. मात्र तुम्हाला माहितीये का, पुरुषांच्या तुलनेत महिलांना दारू अधिक चढते असं मानलं जातं. याबाबत एक नवा अभ्यास देखील समोर आला आहे. हा दाव्यामागे अनेक वैज्ञानिक कारणं आहेत.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना का दारू अधिक प्रमाणात चढते?

अनेकजण या गोष्टीचा संबंध सहनशक्तीशी जोडतात. असं मानलं जातं की, काही लोकांना अल्कोहोल टॉलरेंस अधिक होतो. तर काहींमध्ये याचं प्रमाण कमी असतं. मात्र या ठिकाणी सहनशक्तीचा कोणताही संबंध नाही.

Alcohol tolerance difference
Breast cancer warning signs: महिलांनो.. स्तनाच्या त्वचेत हे ५ बदल होत असतील तर व्हा सावध; ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असू शकतो

विज्ञान काय सांगतं?

विज्ञानाच्या सांगण्यानुसार, महिला आणि पुरुषांमध्ये नशा चढण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे शरीराची रचना. अनेक अभ्यासांमधून असं समोर आलंय की, शरीराच्या रचनेमुळे महिला या दारूच्या सेवनासाठी अधिक संवेदनशील असतात.

शरीराची रचनेचा यावर कसा परिणाम होतो?

एंजाइम्सची एक्टिव्हीटी कमी होते

एका अभ्यासामध्ये पुरुष आणि महिलांना त्यांच्या वजनानुसार, समान मद्य देण्यात आलं. या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आले ते आश्चर्यकारक होते. यामध्ये असं दिसून आलं की, महिलांच्या शरीरात सुरुवातीच्या टप्प्यात अल्कोहोल विघटन करण्यासाठी जबाबदार असलेले एंजाइम्स पुरुषांच्या तुलनेत कमी एक्टिव्ह असतात.

Alcohol tolerance difference
National cancer awareness day: भारतात सर्वाधिक वाढणारे ५ कॅन्सरचे प्रकार; शरीरात 'हे' बदल दिसल्यास लगेच जा डॉक्टरांकडे

ज्यावेळी दारू आपल्या शरीरात जाते तेव्हा हे एंजाइम्स मेटाबोलाईज करण्यासाठी काम करतात. मात्र महिलांमध्ये हे एंजाइम्स कमी प्रमाणात एक्टिव्ह असतात. त्यामुळे दारूचा एक भाग थेट ब्लडमध्ये पोहोचतो. यामुळे महिलांच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण जलद वाढतं.

शरीराचा आकार आणि वजन

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीराचं वजन आणि आकार नशेची पातळी ठरवण्यात महत्त्वाची भूमिक बजावतात. सामान्यपणे महिलांच्या शरीराचा आकार हा पुरुषांच्या शरीराच्या तुलनेत लहान असतो. त्यामुळे या रचनेनुसार जेव्हा लहान व्यक्तीला मोठ्या व्यक्तीच्या तुलनेत मद्य दिलं जातं तेव्हा त्याचं प्रमाण जास्त होतं.

Alcohol tolerance difference
Signs Of Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरचा ट्यूमर शरीरात असताना दिसतात 'ही' 8 लक्षणं

मेंदू कसं देतो रिएक्शन

दारूचा प्रभाव केवळ रक्तापर्यंत मर्यादित राहत नाही. तर त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवरही होतो. संशोधनानुसार, महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा अल्कोहोलच्या परिणामांवर अधिक लवकर रिएक्शन देतो. जशी दारू रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा महिलांच्या न्यूरोलॉजिकल सिस्टीमना ते लवकर जाणवतं. त्यामुळेच महिलांना पुरुषांपेक्षा लवकर दारू चढते.

Alcohol tolerance difference
Cervical cancer: महिलांच्या शरीरात ही 4 लक्षणं दिसली तर सर्वायकल कॅन्सरचा धोका अधिक; संकेत दिसताच करून घ्या टेस्ट

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com