

भारतात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढतेय
स्तन, फुफ्फुस, गर्भाशय कॅन्सर अधिक आढळतात
तंबाखू, प्रदूषण, आहार हे प्रमुख कारणं
भारतामध्ये कॅन्सर हा एक गंभीर आजारांपैकी एक मानलं जातो. या आजाराचं प्रमाण पाहिलं तर दर नऊ व्यक्तींमधील एक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी कॅन्सरने ग्रस्त होण्याची शक्यता आहे. तंबाखू आणि मद्याचे वाढते सेवन, असंतुलित आहार, वायू आणि जलप्रदूषणाचं उच्च प्रमाण, निदानात होणारा विलंब हे प्रमुख कारणीभूत घटक आहेत. गेल्या वर्षी सुमारे १५ लाख नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद झाली असून २०३० पर्यंत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ उमा डांगी यांनी सांगितलं की, स्तन, फुफ्फुस, गर्भाशय, तोंड आणि कोलन कॅन्सर हे सर्वाधिक वाढणारे प्रकार आहेत. जे मिळून भारतातील एकूण कॅन्सरपैकी ५०% पेक्षा अधिक रुग्णसंख्या दर्शवतात. या कॅन्सरची लक्षणं ओळखणं आणि वेळेवर निदान करणं हे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सर म्हणजे म्हणजे स्तनाचा कॅन्सर. प्रत्येक चार महिला कॅन्सरपैकी एक रुग्ण स्तनाच्या कॅन्सरची असते. शहरी भागात याचे प्रमाण अधिक असून उशिरा आई होणं, लठ्ठपणा आणि बैठी जीवनशैली हे धोका वाढवणारे घटक आहेत.
लक्षणं- स्तन किंवा बगलेत भागात गाठ किंवा घट्टपणा जाणवणं, स्तनाच्या आकारात बदल, निप्पलमधून स्त्राव, त्वचेवर सुरकुत्या पडणं
भारतीय पुरुषांमध्ये कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचा प्रमुख कारण म्हणजं फुफ्फुसाचा कॅन्सर. महिलांमध्येही याचं प्रमाण वाढत असून वाढत्या वायू प्रदूषण आणि धूम्रपानामुळे धोका वाढतो आहे.
लक्षणं- सतत खोकला, छातीत वेदना, थोड्या हालचालींनंतरही दम लागणे, रक्तासह खोकला
भारतीय महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. याचं मुख्य कारण म्हणजे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV). सुदैवाने हा कॅन्सर टाळता येण्यासारखा आहे.
लक्षणं- अनियमित योनीतून स्त्राव येणं, पेल्विक भागात वेदना
तोंडाचा कॅन्सर प्रामुख्याने तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानाशी संबंधित आहे. ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये याचे प्रमाण चिंताजनक आहे. भारतात जागतिक तोंडाच्या कर्करोगाच्या एकतृतीयांश रुग्णसंख्या आहे.
लक्षणं- दीर्घकाळ न बरे होणारे तोंडातील अल्सर, पांढरे किंवा लालसर डाग, गिळण्यात अडचण, तोंडात सतत वेदना
शहरी भारतात कोलन आणि रेक्टमचा कॅन्सर झपाट्याने वाढताना दिसतोय. यामागे बदललेली आहारशैली आणि बैठी जीवनशैली कारणीभूत आहे.
लक्षणं - विष्ठेमध्ये रक्त, मलविसर्जनाच्या सवयींमध्ये सतत बदल, अनपेक्षित वजन घट, थकवा
भारतात सर्वाधिक कोणते कॅन्सर आढळतात?
स्तन, फुफ्फुस, गर्भाशय, तोंड, कोलन कॅन्सर आढळतात.
स्तनाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती?
गाठ, स्त्राव, त्वचेवर सुरकुत्या दिसतात.
फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका का वाढतो?
वायू प्रदूषण आणि धूम्रपानामुळे धोका वाढतो.
गर्भाशयाचा कॅन्सर टाळता येतो का?
होय, HPV प्रतिबंध आणि तपासणीने टाळता येतो.
तोंडाच्या कॅन्सरची मुख्य कारणं कोणती?
तंबाखू, गुटखा आणि धूम्रपान हे प्रमुख कारणं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.