Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Major symptoms of diabetes: आजच्या जीवनशैलीत मधुमेह हा एक सामान्य पण गंभीर आजार बनला आहे. सुरुवातीला याची लक्षणे सहसा लक्षात येत नाहीत, ज्यामुळे आजार गंभीर स्वरूप धारण करतो.
Diabetes without blood test
Diabetes without blood testsaam tv
Published On
Summary
  • डायबेटीसमध्ये शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही.

  • वारंवार लघवी होणे हे डायबेटीसचे सुरुवातीचे लक्षण आहे.

  • सतत तहान लागणे आणि भूक लागणे डायबेटीसचे संकेत आहेत.

मधुमेह म्हणजेच डायबेटीस ही एक कायमस्वरूपी परिस्थिती मानली जाते. यामध्ये शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार झालेलं इन्सुलिन योग्य प्रकारे वापरू शकत नाही. त्यामुळे रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं आणि अनेक अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

डायबेटीज तपासण्याचा एका मार्ग आहे. मात्र हा तपासण्याचा योग्य मार्ग रक्त तपासणी असला तरी काही लक्षणं शरीर वेळीच दाखवू लागतं. जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्या. ही ६ लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया.

वारंवार लघवी होणं

डायबेटीसचं हे सर्वात सामान्य आणि सुरुवातीचं लक्षण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी जरी पाणी कमी प्यायलं तरीही लघवीसाठी वारंवार उठावं लागणं. ज्यावेळी रक्तातील साखर खूप वाढते, तेव्हा शरीरातील किडनी अतिरिक्त साखर फिल्टर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हाला सतत लघवीला जावसं वाटू शकतं.

Diabetes without blood test
Early symptoms of pancreatic cancer : स्वादुपिंडाचा कॅन्सर होत असताना शरीरात होतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

सतत तहान लागणं

वारंवार लघवी गेल्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि त्यामुळे तहान जास्त लागते. ही तहान सामान्य तहानेपेक्षा अधिक जास्त असते. यामध्ये तुम्हाला सतत पाणी प्यावसं वाटतं आणि मग तेच पाणी पुन्हा लघवीतून बाहेर जातं.

सतत भूक लागणं

तुम्ही नेहमीप्रमाणे जेवत असलात किंवा जास्त खात असलात तरीही तुम्हाला सारखी भूक लागते का? हे देखील मधुमेहाचं महत्त्वाचं लक्षण आहे. कारण तुमचं शरीर तयार झालेल्या साखरेचा उपयोग पेशींना ऊर्जा देण्यासाठी करू शकत नाही. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि मेंदू पुन्हा खाण्याचे संकेत देतो.

थकवा आणि अशक्तपणा

झोप पूर्ण झाली तरीही थकवा जाणवत असेल, अंगात काहीच उर्जा नसेल, कामात लक्ष लागत नसेल तर हे देखील डायबेटीसचे संकेत असू शकतात. ज्यावेळी साखर पेशींमध्ये जाऊ शकत नाही तेव्हा शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि तुम्ही सतत थकलेले वाटू लागता.

Diabetes without blood test
Brain fluid: मेंदूमध्ये पाणी झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच उपचार करा अन्यथा परिस्थिती ठरेल जीवघेणी

त्वचा कोरडी होणं

रक्तातील साखर जास्त असल्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकतं ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. परिणामी त्वचा कोरडी आणि रूक्ष होते. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त लोशन लावून सोडून देतो. पण ही सतत राहणारी कोरडी त्वचा डायबेटीसचं संकेत असू शकते.

दृष्टी धुसर होणं

साखर वाढल्यामुळे डोळ्यांमधील लेंस सूजते आणि त्याचा आकार बदलतो. यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते. स्क्रीन पाहून डोळ्यांवर ताण आला म्हणून समजून न घेता जर वारंवार अशी दृष्टीसंबंधी समस्या होत असेल तर डॉक्टरांकडे तपासणी गरजेची आहे.

Diabetes without blood test
Liver cancer early symptoms: लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात मोठे ७ बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका
Q

डायबेटीसमध्ये शरीरात काय होते?

A

शरीर इन्सुलिन निर्माण करत नाही किंवा त्याचा योग्य वापर होत नाही, त्यामुळे रक्तात साखर वाढते.

Q

डायबेटीसचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

A

वारंवार लघवी होणे , विशेषतः रात्री उठून लघवीसाठी जाणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे.

Q

सतत भूक लागण्याचे कारण काय?

A

शरीराच्या पेशींना साखरेपासून ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे मेंदू खाण्याचे संकेत पाठवतो.

Q

डायबेटीसमुळे त्वचा का कोरडी होते?

A

उच्च रक्तातील साखरमुळे शरीरात निर्जलीकरण होते, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि रूक्ष होते.

Q

दृष्टी धुसर होणे कशाचे लक्षण आहे?

A

रक्तातील साखर जास्त असल्यामुळे डोळ्याच्या लेन्समध्ये सूज येऊन दृष्टी धुसर होते , हे डायबेटीसचे गंभीर लक्षण आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com