

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, झोपेच्या गोळ्यांमुळे मेंदूच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आलीये. यामध्ये खासकरून अॅम्बियनसारख्या झोपेच्या औषधांमध्ये वापरलं जाणारं झोलपिडेम हे घटक मेंदूतील टॉक्सिन प्रोटीन साफ करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात. परिणामी यामुळे अल्झायमरसारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांचा धोका वाढू शकतो.
Cell या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांनी मेंदूतील glymphatic system चा अभ्यास केला. ही सिस्टीम मेंदूतील अपायकारक प्रोटीन साफ करण्याचं काम करतं. प्रयोगशाळेतील उंदरांवर करण्यात आलेल्या अभ्यासात संशोधकांनी मेंदूतील इलेक्ट्रिकल रीडिंग आणि इमेजिंगच्या माध्यमातून हे निरीक्षण केलं की, नॉन-REM झोपेदरम्यान मेंदूत नॉरएपिनेफ्रिन नावाच्या रसायनामुळे समकालीन लहरी निर्माण होतात. या लहरी मेंदूतील सेरेब्रोस्पायनल फ्लुइडला पंप करण्यास मदत करतात. ज्यामुळे टाऊ आणि अॅमिलॉइडसारखी प्रोटीन साफ होतात. हे प्रोटीन साचल्यास अल्झायमरचा धोका वाढतो.
युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर सेंटर फॉर ट्रान्सलेशनल न्यूरोमेडिसिनच्या सह संचालिका डॉ. मायकन नेडरगार्ड यांच्या टीमला असं आढळून आलं की, झोलपिडेम नॉरएपिनेफ्रिनच्या लहरींवर दबाव टाकतो. त्यामुळे ग्लींफॅटिक सिस्टीमच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि मेंदूतील कचरा साफ होण्याची प्रक्रिया मंदावते.
डॉ. नेडरगार्ड यांनी सांगितलं, झोपेच्या औषधांचा मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो असे निष्कर्ष या अभ्यासातून समोर आले. संशोधकांनी असंही स्पष्ट करून सांगितलं की, हे निष्कर्ष प्राणी अभ्यासावर आधारित आहेत आणि झोपेच्या औषधांचा मानवी मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतो का, हे ठरवण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे.
दररोज एकाच वेळी झोपायला जा आणि उठण्याचा प्रयत्न करा. सुट्टीच्या दिवशीही या वेळी झोपेतून उठा.
झोपायला जाताना तुमची बेडरूम थंड आणि शांत ठेवा. झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीनचा वापर टाळा.
झोपेच्या वेळेच्या वेळे अगोदर कॅफेन, निकोटीन किंवा मद्यपान करणं टाळा. त्याऐवजी कॅमोमाईल किंवा व्हॅलेरियन रूटसारख्या हर्बल चहा निवडा.
दिवसभरात शारीरिक हालचाल केल्याने गाढ झोप लागते. परंतु झोपेच्या अगदी आधी अतिप्रमाणात आणि हेवी व्यायाम टाळा.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.