Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

Early signs of cancer in women: कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे, पण जर त्याचे लवकर निदान झाले, तर त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. महिलांमध्ये कर्करोगाचे काही प्रकार अधिक प्रमाणात आढळतात. अनेकदा महिला शरीरातील लहान-मोठ्या बदलांकडे दुर्लक्ष करतात
Early signs of cancer
Early signs of cancersaam tv
Published On
Summary
  • महिलांमध्ये कॅन्सरची लक्षणे सौम्य वाटू शकतात.

  • वजन कमी होणे कॅन्सरचा इशारा असू शकते.

  • सतत थकवा ल्युकेमियाचे लक्षण असू शकतो.

जगभरात निदान आणि उपचारांमध्ये मोठी प्रगती झालेली असली तरी कॅन्सर अजूनही गंभीर आरोग्य समस्या मानली जाते. महिलांमध्ये या आजाराची सुरुवातीची लक्षणं बहुतांश वेळी सौम्य तक्रारींसारखी वाटतात. यामध्ये थकवा, हार्मोनल बदल, जीवनशैलीतील ताणतणाव अशा कारणांना जबाबदार धरून ती दुर्लक्षिली जातात. मात्र तज्ज्ञांच्या मते, कॅन्सर जितक्या लवकर ओळखला जातो तितका उपचार परिणामकारक होतो.

महिलांच्या शरीररचनेमुळे, प्रजनन काळातील बदलांमुळे आणि हार्मोन्समुळे काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका अधिक असतो. स्तनाचा कॅन्सर, अंडाशयाचा , गर्भाशयाचा व गर्भाशयमुखाचा कॅन्सर हे सर्वाधिक आढळणारे प्रकार आहेत. याशिवाय महिलांना कोलन, फुफ्फुस आणि त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो. म्हणूनच सुरुवातीची लक्षणं ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

महिलांनी ही लक्षणं वेळीच ओळखावीत

कारणाशिवाय वजन कमी होणं

आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल न करता अचानक वजन कमी होणं ही धोक्याची घंटा असते. अशा प्रकारचे वजन कमी होणं हे पोट, स्वादुपिंड किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

Early signs of cancer
Early symptoms of pancreatic cancer : स्वादुपिंडाचा कॅन्सर होत असताना शरीरात होतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

सतत जाणवणारा थकवा

एखाद्या दिवसाच्या कामानंतर थकवा जाणवणं स्वाभाविक आहे. पण भरपूर विश्रांती घेतल्यानंतरही थकवा कायम राहिला तर तो रक्ताशी संबंधित कॅन्सर जसं की, ल्युकेमियाचे लक्षण असू शकतो.

असामान्य रक्तस्त्राव

मासिक पाळीच्या पलीकडे रक्तस्त्राव होणं, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणं किंवा पाळीदरम्यान अतिप्रमाणात रक्तस्राव होणं हे गर्भाशय किंवा गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात. शौचात किंवा लघवीत रक्त दिसल्यास तो कोलन किंवा मूत्राशयाच्या कॅन्सरचा इशारा असू शकतो.

Early signs of cancer
Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

स्तनात गाठ किंवा बदल

स्तनाच्या कॅन्सरचे सुरुवातीचं लक्षण म्हणजे स्तनात किंवा बगलाखाली गाठ येणं. स्तनाचा आकार बदलणे, त्वचेवर खळी पडणं किंवा स्तनाग्रातून स्त्राव होणं हे देखील महत्त्वाचे संकेत आहेत. नियमित तपासण्या व स्क्रिनिंग केल्यास हे वेळीच ओळखणं शक्य होतं.

Early signs of cancer
Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

त्वचेतील बदल

त्वचेवर विचित्र डाग, मांसाचे गाठीसारखे ठिपके किंवा बरे न होणारे व्रण हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतात. शरीरावरील चामखीळाचा रंग, आकार किंवा आकारमान बदलत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या.

Q

महिलांमध्ये कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे का दुर्लक्षित होतात?

A

लक्षणे सौम्य असल्यामुळे आणि थकवा, हार्मोनल बदलांमध्ये दुर्लक्षित केली जातात.

Q

आहार-व्यायाम न बदलता वजन कमी होण्याचे कारण काय असू शकते?

A

पोट, स्वादुपिंड किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरची ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

Q

सतत जाणवणारा थकवा कोणत्या कॅन्सरचे लक्षण आहे?

A

भरपूर विश्रांतीनंतरही थकवा राहिल्यास तो ल्युकेमियाचे लक्षण असू शकतो.

Q

गर्भाशयाच्या कॅन्सरचे मुख्य लक्षण कोणते?

A

मासिक पाळीच्या बाहेर रक्तस्त्राव होणे हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण आहे.

Q

स्तनातील कोणते बदल कॅन्सरचा इशारा देतात?

A

स्तनात किंवा बलाखाली गाठ येणे, आकार बदलणे किंवा स्त्राव होणे हे इशारे आहेत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com