Signs Of Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरचा ट्यूमर शरीरात असताना दिसतात 'ही' 8 लक्षणं

Early warning signs of stomach cancer: गॅस्ट्रिक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा सामान्य पचन समस्या किंवा गॅस समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र, ही लक्षणे वारंवार आणि दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Early warning signs of stomach cancer
Early warning signs of stomach cancersaam tv
Published On

जेव्हा पोटामध्ये अचानक असामान्य पेशींची वाढ होते तेव्हा त्याला पोटाचा म्हणजेच गॅस्ट्रिक कॅन्सर म्हटलं जातं. या असामान्य पेशी ज्यावेळी गाठीमध्ये रूपांतरित होतात तेव्हा या कॅन्सरची सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात या कॅन्सरची फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा याची लक्षणं दिसून येतात त्यावेळी हा कॅन्सर इतर अवयवांमध्ये पसरलेला असतो.

गॅस्ट्रीक कॅन्सर हा अत्यंत वेदनादायक मानला जातो. हा आजार सामान्यतः आनुवंशिक माहीये. परंतु बहुतांश प्रकरणं ही अनियमित DNA बदलांमुळे होतात. मुख्य म्हणजे या आजाराची जी लक्षणं दिसून येतात ती सहजरित्या दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे वेळेवर निदान होण्यासाठी सुरुवातीची लक्षणं ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.

गॅस्ट्रीक कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणं

मलाच्या स्वरूपात बदल

शौचाला गेल्यानंतर मलाचा आकार, वारंवारता किंवा घट्टपणात बदल होणं आणि पोटात सतत अस्वस्थता जाणवणं गॅस्ट्रीक कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षणं मानण्यात येतं. यावेळी मलामध्ये रक्त दिसणं ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी आवश्यक आहे.

Early warning signs of stomach cancer
Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

सततची पोटदुखी

जर एखाद्या व्यक्तीला पोटात सतत वेदना जाणवत असतील तर हे पोटात कॅन्सरची गाठ असल्याचे संकेत असू शकतात. अनेकदा ही गाठ वाढत असल्याचंही हे लक्षण मानलं जातं. त्यामुळे या वेदनांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा.

भूक मंदावणे

अनेक कारणांमुळे रूग्णांना भूक न लागण्याची समस्या जाणवू शकते. मात्र जर तुम्हाला सतत भूक लागत नसेल तर हे गॅस्ट्रिक कॅन्सरचं लक्षण असल्याची शक्यता आहे. पोटामध्ये अल्सर झाला असेल तरीही रूग्णाला भूक लागत नाही. त्यामुळे अशावेळी वेळीच तपासणी करू घ्यावी.

अचानक वजन कमी होणं

जर तुमच्या वजनात काहीही न करता घट होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. वजनात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली तर त्याचा संबंध पोटाच्या कॅन्सरशी असतो. अशावेळी डॉक्टरांकडे धाव घेणं फायद्याचं आहे.

Early warning signs of stomach cancer
Dengue symptoms monsoon : पावसाळ्यात वाढतेय डेंग्यूच्या रूग्णांची संख्या; पावसाळी आजाराची लक्षणं ओळखून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

वारंवार एसिडीटी होणं

सतत अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असेल तर ते पोटाच्या कॅन्सरचं एक लक्षण असण्याची शक्यता आहे. हा त्रास सतत होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पोटफुगी आणि जुलाब

तुम्हाला अचानक जुलाब होत असतील किंवा सतत पोचट फुगल्यासारखं वाटत असेल तर हे पोटात गाठ असल्याचे संकेत असतात. अशावेळी रूग्णाला शौचास देखील त्रास होऊ लागतो. ही लक्षणं सतत राहिल्यास डॉक्टरांकडून तपासणी आवश्यक आहे.

Early warning signs of stomach cancer
Weight Loss Tips: पोटाच्या टायर्सनं हैराण झालात? घरचं जेवण करा अन् वजन घटवा; तज्ज्ञ सांगतात...

खाणं गिळण्यास अडचण

जर कॅन्सर हा अन्ननलिकेत पसरला असेल तर अन्न गिळताना तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. यावेळी खाण्यापिण्याच्या वेळी खोकला किंवा श्वास लागणं हा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

लवकर पोट भरणं

जर कॅन्सरची गाठ प्रगत अवस्थेत पोहोचली असेल तर रूग्णाला पोट लवकर भरल्यासारखं वाटू शकतं. अशावेळी थोडं जेवल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटू शकतं.

Early warning signs of stomach cancer
Liver Health : फॅट लॉस ते लिव्हर Detox; 'ही' कॉफी रोज प्या, तब्येत राहिल फिट, सगळे आजार छुमंतर

खाली दिलेल्या गोष्टी पोटाच्या कॅन्सरचा धोका करतात कमी

  • तंबाखूजन्य पदार्थ टाळा, दारूचं अतिसेवन करू नका

  • वनस्पतीजन्य आहार घ्यावा

  • आंबट किंवा लोणच्याचे पदार्थ टाळा

  • वजन नियंत्रणात ठेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com