Father's Day Special : मुलीच का असतात बाबांच्या लाडक्या? बाप-लेकिच्या सुंदर नात्याचं रहस्य जाणून घ्या

Happy Father's Day : वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं.
Fathers Day Special
Fathers Day SpecialSaam Tv
Published On

Bond of Father-Daughter Relationship : 'तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक म्हणजे वडील-मुलीचे नाते. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, मुलगी वडिलांच्या जवळ असते आणि मुलगा आईच्या जवळ असतो. आणखी एका संशोधनात असे समोर आले आहे की, मुलगी जर वडिलांच्या जवळ राहिली तर ती कधीही एकटेपणाची शिकार होऊ शकत नाही.

वडील (Father) आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. ज्या मुलींचं आपल्या वडिलांसोबतच नातं सुंदर असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आठवणी सुंदर असतात. आपल्या वडिलांबरोबर चांगलं नातं असल्यास आपल्या स्वभावावरही त्याचा परिणाम होत असतो. जो भविष्यातील वैवाहिक आयुष्यावर प्रभाव टाकत असतो.

Fathers Day Special
Happy Father's Day : I Love You Daddy...आज आहे 'फादर्स डे' जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

मुलीचं (Girl) लग्न झालं की आई तिला बरोबरीने वागवते. बाबांच्या बाबतीत काय बदल होतात? लाडात वाढलेली लेक सासरी गेल्यावर बाबा अधिक हळवे झाल्याचा अनुभव आजच्या तरुणींना येतो. मुलीचे सासर आणि तिच्या भविष्याचा विचार यामुळे काळजी करण्यात ते आईपेक्षा अजिबातच मागे नसतात

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुलींना त्यांच्या वडिलांशी घट्ट आसक्ती असते त्यांना एकटेपणाचा बळी पडण्याची शक्यता कमी असते. अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक जिन फेंग म्हणाले की, वडील आणि मुलगी यांच्यातील जवळीक मुलींना एकटेपणाचा सामना करण्यास मदत करते.

Fathers Day Special
Fathers Day 2023: कमी किंमत जबरदस्त रेंज, वडिलांना गिफ्ट्स करा 'या' इलेक्ट्रिक स्कूटर, ‘फादर्स डे’ होईल स्पेशल

वडील लेकीच्या नात्याचं महत्त्व

प्रत्येक मुलीच्या मानसिक (Mental) आरोग्याच्या दृष्टीने तरूण वयातलं वडील-मुलीचं नातं घडवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांशी भावनिकरित्या जोडलेली असते. ज्याचा फायदा तिला संपूर्ण आयुष्य होतो. यामागे अनेक कारणं आहेत.

  • वडील हे मुलींसाठी रोल मॉडेल असतात. त्यांच्या सुरक्षा, विश्वास आणि प्रेमाचा ते जणू पाया असतात.

  • आपल्या वडिलांवरूनच मुलगी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरूषाला जज करत असते. त्यामुळे वडील हे आपल्या मुलीसाठी आदर्श उदाहरण असतात.

  • मुलींमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य हे वडिलांशी असलेल्या चांगल्या नात्यातूनच निर्माण होतं.

  • जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात रस घेतात तेव्हा तिचा विश्वास दुणावतो. करिअर निवडणाच्याबाबतीतही वडिलांची साथ मिळाल्यास मुलींना उंच भरारी घेणे शक्य होते. ज्यामुळे त्या हमखास यशस्वी होतात.

  • प्रेमळ वडील हे आपल्या मुलीला तिच्याबाबत नेहमी चांगली भावना निर्माण करतात. ज्याची मदत तिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होते.

Fathers Day Special
Happy Fathers Day Gift's: बाबांना हे स्पेशल गिफ्ट द्या; तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

मुलीच्या आयुष्यावर वडिलांचा प्रभाव -

वडील मुलींच्या नात्याचे तीन टप्पे असतात. काही कठीण तर काही सोपे आणि मजेशीर पण प्रत्येक टप्पा हा महत्त्वाचा असतो.

मुलगी लहान असताना -

मुली या नेहमी ‘पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीचा बाबा हाच सुपरहिरो असतो. मुलीच्या मानसिक आणि भावनिक विकासात आईप्रमाणेच बाबांचाही तेवढाच वाटा असतो.

ज्या मुलीचं नातं वडिलांसोबत चांगलं असतं त्यांना आयुष्यातील समस्या सोडवताना त्रास होत नाही. त्यांच्यात भीती आणि एखाद्या समस्येला टाळण्याची वृत्ती कमी असते. मुलीचं संगोपन करताना त्यांना सुरक्षित वाटणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपले वडील आपल्यासोबत आहेत याची हमी मुलीला असते तेव्हा तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.

Fathers Day Special
Father's Day 2023 Gift Idea: यंदाच्या 'फादर्स डे' ला बाबासाठी असे करा स्पेशल सरप्राइज प्लान !

मुली वयात येताना -

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खूप किचकट टप्पा असतो. कारण या वयात वडील आणि मुलीमध्ये अनेक वादविवाद निर्माण होऊन दुरावा येण्याची शक्यता असते. वडिलांनी संवाद साधणं आणि मुलीला विश्वासात घेतल्यास तिला आयुष्यात योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

कारण याच वयात मुली वाईट प्रभावाखाली येण्याची शक्यता असते. वडीलांचं प्रेम मुलीला तिच्या आयुष्यात महत्त्व देणारं कोणीतरी आहे याची जाणीव करून देतं. अशा मुली या वागण्यात आणि संवादाच्या बाबतीही आत्मविश्वास असणाऱ्या असतात.

मुलगी मोठी झाल्यावर -

चांगल्या नात्यांमुळे मुलं ही नेहमीच सगळ्याबाबतीत प्रगतीशील बनतात. मुलीचं लग्न ठरताना किंवा करिअर निवडताना तिला आईसोबत वडिलांची सगळ्यात जास्त गरज असते. मुलीचं लग्न ठरवताना तर वडिलांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची असते.

आपल्या मुलीला योग्य जोडीदार निवडण्यासाठी मदत करणं किंवा त्याबाबत योग्य मार्गदर्शन करणं हे फार महत्त्वाचं असतं. जर आईवडिलांचं नातं सुदृढ असेल तर मुलीचं वैवाहीक जीवनही चांगला आकार घेतं. कारण ती आईवडिलांच्या नात्यातून बऱ्याच गोष्टी शिकत असते आणि बघत असते.

Fathers Day Special
Father's Day 2023 Gift Idea: यंदाच्या 'फादर्स डे' ला बाबासाठी असे करा स्पेशल सरप्राइज प्लान !

वडिलांच्या अनुपस्थितीत मुलींवर होणारा परिणाम -

घटस्फोट, वडिलांचा मृत्यू किंवा आईवडिलांमधील दुरावा यामुळे मुलं पालकांपासून दूर होतात. पण काही वेळा सतत कामात असलेल्या वडिलांमुळेही असं होऊ शकतं. त्यांच्या अनुपस्थितीत मुलीच्या जडणघडणीवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. वडिलांशिवाय मुली कमी आत्मविश्वास असणाऱ्या, स्वतःचं महत्त्व न समजणाऱ्या आणि अबोल होतात.

  • वडील नसल्यामुळे मुलींच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. जी त्यांचा स्वभाव आणि आयुष्य पूर्णतः बदलू शकते. अशा मुलींना समाजात वावरताना एका दडपणाखाली किंवा न्यूनगंड मनात ठेवून वावरताना दिसतात.

  • वडीलांची कमतरता त्यांच्यात वेळेआधीच हार्मोनल बदलही घडवू शकते. अशा मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या किंवा गर्भधारणेबाबतच्या समस्या आढळतात.

  • मुलगी जेव्हा योग्य वातावरणात आणि योग्य मार्गदर्शनात वाढते तेव्हा ती करिअरही चांगलं करते. पण वडीलांच्या अनुपस्थितीत याउलट होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com