
Father's Day 2023 : आपल्या जन्मापासून आपण आपल्या पायावर उभे राहण्यापर्यंत कधी मायेने तर कधी कठोर होऊन साथ देणारी व्यक्ती म्हणजे आपले वडिल. फणसासारखे वरून काटेरी वाटणारे आपले बाबा आतील गऱ्यांसारखे गोड असतात.
आपल्या जन्मापूर्वीपासूनच आपल्या उत्तम भविष्यासाठी (Future) कधी आपल्या पोटाला चिमटा काढत, तर कधी आपल्या स्वप्नांना, आवडींना बाजूला सारत ते दिवसरात्र फार कष्ट घेत असतात. या कष्टांची आपण कधीच परतफेड करू शकत नाही परंतु, त्यांना एखादी अविस्मरणीय आठवण देऊन त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी त्यांचे आभार तर नक्कीच मानू शकतो. तेव्हा या 'फादर्स डे'च्या निमित्तनाने जर तुम्ही देखील आपल्या वडिलांसाठी काहीतरी खास करायचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्या नक्कीच कामी येऊ शकते.
'फादर्स डे'ला कसे बनवाल खास ?
1. वडिलांसाठी एखादी खास ट्रिप प्लान करू शकता.
'फादर्स डे' या महिन्याच्या 18 तारखेला म्हणजेच रविवरी आला आहे. तुम्ही या सुट्टीच्या दिवशी आपल्या वडिलांसाठी एक ट्रिप (Trip) प्लान करू शकता. त्यांना कुठे तरी फिरायला घेऊन जाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या बरोबर काही वेळ घालवता येईल, त्यांना वेळ देता येईल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल व त्यांना तो क्षण कायमचा आठवणीत राहील.
2. वडिलांना आवडणारी एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
आपल्या वडिलांनी आपल्या स्वप्नांसाठी नेहमी त्यांच्या स्वप्नांनांना, आवडींना दूर लोटलेले असते. त्यामुळे या 'फादर्स डे'ला तुम्ही त्यांना त्यांची एखादी आवडती वस्तू देऊन त्यांच्यासाठी हा दिवस खास करू शकता.
3. आपल्या वडिलांसाठी एखादा कार्यक्रम आयोजित करू शकता.
आजवर ज्यांनी तुमच्या वाढदिवसासाठी घर सजवले, तुमच्या मित्रांना बोलावून तुमच्या आनंदात भर घातली, त्या वडिलांसाठी देखील तुम्ही अशीच एखादी पार्टी आयोजित करू शकता. त्यांच्या मित्रांना बोलावू शकता, त्यांच्या आवडीचे पदार्थ (Food) बनवू शकता. ही देखील एक अविस्मरणीय आठवण ठरू शकते.
4. वडिलांना काही मोठ्या जबाबदाऱ्यांतून मोकळे करू शकता.
जर तुम्ही आपल्या वडिलांच्या मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी सक्षम असाल तर हा दिवस त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यासाठी उत्तम ठरेल. तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून वडिलांना त्यांच्या जबाबदारीतून मोकळे करून त्यांच्या खांद्यांवरचे ओझे कमी करू शकता. अशा लहान-लहान गोष्टींतून तुम्ही आपल्या वडिलांसाठी हा 'फादर्स डे' खास आणि अविस्मरणीय करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.