
Why We Celebrate Father's Day : सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुल्या, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला... आपल्या घराचे सगळ्यात मोठा आधार हे बाबा असतात. संपूर्ण कुटुंबाची काळजी देखभाल घेण्यासाठी रात्रदिवस मेहनत करत असतात.
दरवर्षी फादर्स डे जून (June) महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थात १८ जूनला साजरा केला जाणार आहे. अमेरिकेत फादर्स डे हा जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
1. पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता ?
फादर्स डे पहिल्यांदा 1910 मध्ये साजरा करण्यात आला, परंतु केवळ सहा दशकांनंतर त्याला अधिकृत सुट्टीचा दर्जा मिळाला. 1910 नंतर, या दिवसाची लोकप्रियता हळूहळू अमेरिकेच्या इतर शहरांमध्ये पसरू लागली आणि लोकांना त्यांच्या आयुष्यात वडिलांचा (Father) सन्मान करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने लोक वडिलांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू लागले.
2. इतिहास (History) आणि महत्त्व
मदर्स डेची प्रेरणा घेऊन फादर्स डेही साजरा करण्यात आला. 1908 सालापासून फादर्स डेला सुट्टी जाहीर करण्याचे ठरविले पण 1914 मध्ये अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अधिकृतपणे सुट्टी जाही केली. जेव्हा वर्षातून एक दिवस मातांसाठी समर्पित असू शकतो, तेव्हा सोनोरा स्मार्ट डॉडने विचार केला की वडिलांसाठीही एक दिवस असावा. मदर्स डेपासून प्रेरित होऊन त्याने वडिलांसाठीही खास दिवस बनवला.
सोनोराचे संगोपन एका विधुर व्यक्तीने केले असे मानले जाते. सोनोरासोबत त्याने आणखी 14 मुलांना जन्म दिला. यामुळेच त्यांनी वडिलांना आदर देण्याचा विचार केला. त्यानंतर 1910 मध्ये 19 जून रोजी प्रथमच फादर्स डे साजरा करण्यात आला. हळूहळू हा उत्सव अमेरिकेच्या इतर शहरांमध्ये पसरला आणि नंतर 1916 मध्ये विल्सनने ते अधिकृत केले.
1924 मध्ये राष्ट्राध्यक्ष कॅल्विन कूलिज यांनी इतर राज्यांना हा दिवस साजरा करण्याचा सल्ला दिला. 1966 मध्ये, अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी वडिलांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच घोषणा केली आणि दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. 1972 मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी कायद्यात स्वाक्षरी केल्यानंतर फादर्स डे हा यूएसमध्ये कायमचा सुट्टीचा दिवस बनला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.