
Gift's For Fathers: कितीही संकटं आली तरी देखील प्रत्येकाच्या पाठीशी त्यांचे वडील कायमच उभे असतात. ठेच लागली की पटकन तोंडून आई गं असं येतं पण मोठं संकट समोर असेल तर प्रत्येकाच्या तोंडून बापरे असेच शब्द येतात. आपल्या मुलांसाठी बाबा स्वत:ची स्वप्ने बाजूला ठेवतात. स्वत: तुटलेली चप्पल घालतात मात्र मुलांना हवं ते घेऊन देतात. १६ जूनला सर्वजण फादर्स डे साजरा करतात. अशात यंदा बाबांसाठी तुम्ही काही गिफ्ट घेतलं आहे का?
बाबा आपल्याला सर्वकाही पुरवतात. त्यामुळे बाबांसाठी आपण काय गिफ्ट घ्यावं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यामुळे आज बाबांसाठी काही गिफ्ट्सची यादी घेऊन आलो आहोत. तुम्ही या पैकी कोणतंही एक गिफ्ट बाबांसाठी विकत घेऊ शकता.
ब्लूटूथ स्पीकर
वृद्ध असो अथवा तरुण प्रत्येकाला गाणी ऐकायला फार आवडते. गाणी ऐकण्यासाठी वयाची काही मर्यादा नाही. तुमच्या बाबांना देखील गाणी ऐकण्याची फार आवड असेल तर तुम्ही त्यांना ब्लूटूथ स्पीकर देऊ शकता. जर बाबा ऑफीससाठी रोज प्रवास करत असतील तर तुम्ही त्यांना एक ब्लूटूथ इअरफोन गिफ्ट म्हणून देऊ शकता.
सारेगामा कारवां
जुन्या काळातील अनेक गाणी आजही अजरामर आहेत. तुमच्या बाबांना जुनी गाणी आवडत असतील तर सारेगामा कारवां हे एक बेस्ट ऑप्शन आहे. सारेगामा कारवांमध्ये हाजारो जुनी गाणी आहेत. तसेच ही गाणी MP3 प्लेअरमध्ये उपलब्ध आहेत.
स्टायलीश छत्री
आता पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळा म्हटलं की प्रत्येकाला छत्रीची आवश्यकता असते. अनेकदा घरात गेल्या वर्षीची छत्री बाबा वापरतात आणि मुलांसाठी नवीन छत्री विकत घेताली जाते. त्यामुळे तुम्ही बाबांसाठी छत्री विकत घेऊ शकता.
सुंदर शर्ट
सामान्य कुटुंबांमध्ये बाबांच्या अंगावर असलेला शर्ट पार खराब झालेला असतो. बाबा वर्षभर आपल्याकडे अससेले ३ ते ४ शर्टच वापरतात. त्यामुळे तुम्ही बाबांसाठी सुंदर शर्ट गिफ्ट करु शकता.
मोबाईल फोन
जर तुमच्या बाबांकडे स्मार्ट फोन नसेल आणि त्यांना तसा फोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही छानसा स्मार्ट फोन बाबांना गिफ्ट करु शकता. आजकाल सर्वच जण सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यामुळे तुमच्या बाबांना देखील स्मार्ट फोननुळे सोशल मीडियावर येण्याची संधी मिळेल.
बाबा नेहमीच आपल्यासाठी काही ना काही घेत असतात. त्यामुळे जेव्हा मुलं बाबांसाठी गिफ्ट खरेदी करतात तेव्हा त्या पित्याचा आनंद गगणात मावेनासा होतो. बाबा तुमच्यावर खुश होऊन तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.