Fathers Day 2023
Fathers Day 2023Saam Tv

Fathers Day 2023: कमी किंमत जबरदस्त रेंज, वडिलांना गिफ्ट्स करा 'या' इलेक्ट्रिक स्कूटर, ‘फादर्स डे’ होईल स्पेशल

कमी किंमत जबरदस्त रेंज, वडिलांना गिफ्ट्स करा 'या' इलेक्ट्रिक स्कूटर, ‘फादर्स डे’ होईल स्पेशल

Father's Day 2023 : आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ असलेल्या, कायम कुटूंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या वडिलांविषयी आपण कधीतरी व्यक्त व्हायला हवं. 18 जून रोजी ‘फादर्स डे’साजरा करण्यात येतोय. यंदाच्या ‘फादर्स डे’ला तुमच्या प्रेमळ वडिलांना गिफ्ट्स देऊन इम्प्रेस करु शकता.

त्यासाठी इलेक्ट्रिक स्‍कूटर्स हा जबरदस्त पर्याय आहे. इलेक्ट्रिक स्‍कूटर्स पर्यावरणास अनुकूल, कार्यक्षम व युजर-अनुकूल आहेत. ज्‍यामुळे वडिलांसाठी योग्‍य गिफ्ट आहेत. वडिलांना भेट देण्यासाठी आघाडीच्या पाच इलेक्ट्रिक स्‍कूटर्सबाबत (Electric Scooter) माहिती आणि त्‍याची वैशिष्‍ट्ये जाणून घेऊयात.

Fathers Day 2023
Simple One Electric Scooter Launched: मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार! नवीन सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero Electric Photon LP: हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी, किंमत – 86,391 रूपये 

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ही भारतात उपलब्‍ध असलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे आणि एक व्‍हेरिएण्‍ट व तीन रंगांमध्‍ये येते. या स्‍कूटरमध्‍ये 1200 वॅट मोटर आणि संयोजित ब्रेकिंग सिस्‍टमसह फ्रण्‍ट व रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत. फोटॉन दोन ड्राइव्‍ह मोड्स: पॉवर व इकोनॉमी असलेली हाय-स्‍पीड स्‍कूटर आहे, जी 45 किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते.  (Latest Marathi News)

ही स्‍कूटर संपूर्ण चार्ज असल्‍यास पॉवर मोडमध्‍ये जवळपास 50 किमीपर्यंत आणि इकोनॉमी मोडमध्‍ये 80 किमीपर्यंत अंतर पार करण्‍याची खात्री देते. या स्‍कूटरमध्‍ये पॉलिकार्बोनेट हेडलॅम्‍प, फ्रण्‍ट टेलिस्‍कोप सस्‍पेंशन, फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेकआणि अॅण्‍टी-थेफ्ट अलार्म आहे. या स्‍कूटरकरिता राइडर्सकडे परवाना व नोंदणी असणे आवश्‍यक आहे. फोटॉन ब्‍लॅक, बरगंडी व व्‍हाइट या तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. 

Odysse Electric Hawk: ओडीसी हॉक, किंमत – 99,400 रूपये 

इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक क्रूझ कंट्रोल असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली मोटर व कीलेस इलेक्ट्रिक स्‍टार्ट सिस्‍टम आणि पोर्टेबल बॅटरी आहे. ही स्‍कूटर 2 व्‍हेरिएण्‍ट्स हॉक लाइट व हॉक प्‍लससह येते आणि ट्रान्‍स मॅट ब्‍ल्‍यू, इंटेन्‍स रेड, ग्रॅव्हिटी ग्रे, मिरेग व्‍हाइट व चारकोल ब्‍लॅक अशा आकर्षक रंगांच्‍या रेंजमध्‍ये येते, ज्या निश्चितच रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. (Latest Auto News in Marathi)

इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक तिच्‍या लिथियम-आयन बॅटरीसह आरामदायी व विश्‍वसनीय राइड देते. ही बॅटरी 4 तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते आणि प्रतिचार्ज 170 किमीची रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, अॅडजस्‍टेबल ब्रेक लेव्‍हर, मोबाइल चार्जर पॉइण्‍ट, म्‍युझिक सिस्‍टम, डिजिटल स्‍पीडोमीटर असण्‍यासोबत मोठी बूट स्‍पेस आहे, ज्‍यामुळे तुम्‍हाला तुमच्‍या वस्‍तू सुरक्षितपणे व सुलभपणे स्‍टोअर करता येतात. स्‍कूटर तीन वर्षांच्‍या वॉरंटीसह येते, ज्‍यामधून आगामी वर्षांमध्‍ये विनासायास राइडची खात्री मिळते. 

Hero Electric Optima CX 2.0: हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स 2.0, किंमत – 1,07,000रूपये

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स 2.0 भारतातील ईव्‍ही क्षेत्रातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे, ज्‍यामध्‍ये अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये व कार्यक्षमता वाढवणारी वैशिष्‍ट्ये आहेत. 1.07 लाख रूपये किंमत असलेली ही स्‍कूटर एका रंग पर्यायामध्‍ये उपलब्‍ध आहे. स्‍कूटरमध्‍ये 2 केडब्‍ल्‍यूएच बॅटरी आहे, जी एका चार्जमध्‍ये 89 किमी/चार्ज रेंज देते. विश्‍वसनीय ब्रेकिंग व सस्‍पेंशन सिस्‍टमसह ऑप्टिमा सीएक्‍स 2.0 लभ ड्रायव्हिंग अनुभव देते.  

Okinawa Ridge 100: ओकिनावा रिज 100, किंमत – 115,311 रूपये 

ओकिनावा रिज 100 एक व्‍हेरिएण्‍ट व तीन रंगांमध्‍ये येते. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली 800 वॅट मोटर आणि इलेक्‍ट्रॉनिकली असिस्‍टेड ब्रेकिंग सिस्‍टमसह फ्रण्‍ट व रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत. आकर्षक डिझाइन, व्‍यावहारिक वैशिष्‍ट्ये आणि 149  किमीच्‍या रेंजसह रिज 100 मध्‍ये प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत, जसे सेंट्रल लॉकिंग, अॅण्‍टी-थेफ्ट सिस्‍टम, जिओ-फेन्सिंग, इमोबिलायझेशन, पार्किंग असिस्‍टण्‍स, ट्रॅकिंगव मॉनिटरिंग. ही स्‍कूटर जवळपास पाच ते सहा तासांत संपूर्ण चार्ज होते आणि 50 किमी/तासची अव्‍वल गती देते. 

Fathers Day 2023
Home Rent Agreement: भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठीच का केला जातो, त्याचा लाभ घरमालकांना मिळतो का?

ओला एस 1, किंमत – 1,29,999 रूपये 

भारतात ओला एस१ इलेक्ट्रिक स्‍कूटर ओला एस१ आणि ओला एस१ प्रो या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. दोन्‍ही मॉडेल्‍समध्‍ये कॉम्‍पॅक्‍ट डिझाइनसह ट्विन-पॉड हेडलाइट्स, एलईडी डीआरएल रिंग, स्‍लीक इंडिकेटर्स, एैसपैस स्‍टोरेज आणि विविध रंग पर्याय आहेत. 8.5 केडब्‍ल्‍यू मोटरची शक्‍ती असलेली ओला एस-1 90 किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते आणि प्रतिचार्ज 121 किमीची रेंज देते, तर ओला एस१ प्रो 115 किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते आणि प्रतिचार्ज 181 किमीची रेंज देते.

दोन्‍ही व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जसे रिमोट लॉक/अनलॉक, इन्‍फोटेन्‍मेंट, जीपीएस, अॅण्‍टी-थेफ्ट अलर्टस्, डिस्‍क ब्रेक्‍स आणि संयोजित ब्रेकिंग सिस्‍टम. ओला एस१ प्रो मध्‍ये अतिरिक्‍त वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे जसे क्रूझ कंट्रोल व वॉईस असिस्‍ट. नुकतेच, ओला इलेक्ट्रिकने 91 किमीची रेंज देणारी २ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी आणि 141 किमीची रेंज देणारी ३ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी या दोन बॅटरी पर्यायांसह एस१ला अपडेट केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com