Happy Father's Day : I Love You Daddy...आज आहे 'फादर्स डे' जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

How To Celebrate Father's Day : 'फादर्स डे' दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो.
Happy Fathers Day
Happy Fathers Day Saam Tv
Published On

Inspirational Fathers Day messages : 'फादर्स डे' दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो. ‘बाबा’ हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याला सगळ्यात जास्त आनंद होतो अशी व्यक्ती म्हणजे आपले वडील असतात. मग पितृदिनाच महत्त्व जाणून यंदा 18 जून रोजी हा दिवस साजरा केला जाईल.

हा दिवस वडिलांचे प्रेम (Love) आणि कर्तव्यांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. माहितीनुसार, 1907 मध्ये पहिल्यांदा 'फादर्स डे' अनधिकृतपणे साजरा करण्यात आला. अधिकृतपणे ते 1910 मध्ये सुरू झाले. ज्याचा प्रस्ताव सोनोरा स्मार्ट डॉड या अमेरिकेत राहणाऱ्या महिलेने मांडला होता. त्याचा इतिहास (History) आणि महत्त्व जाणून घेऊया.

Happy Fathers Day
Fathers Day 2023: कमी किंमत जबरदस्त रेंज, वडिलांना गिफ्ट्स करा 'या' इलेक्ट्रिक स्कूटर, ‘फादर्स डे’ होईल स्पेशल

इतिहास -

माहितीनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या सोनोरा स्मार्ट डोड नावाच्या महिलेने 'फादर्स डे' साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. जे आधी लोकांनी मान्य केले नव्हते आणि उपहासात्मक कमेंट करून डॉडची खिल्ली उडवली होती. पण काही काळानंतर लोकांना डॉडचा प्रस्ताव आणि वडिलांचे महत्त्व समजले आणि तेव्हापासून 'फादर्स डे' जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जाऊ लागला.

महत्त्व -

पालकांचे प्रेम आणि समर्पण शब्दात वर्णन करणे कठीण असले तरी. पण वडिलांचे प्रेम आणि त्यागाचे महत्त्व समजून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 'फादर्स डे' साजरा (Celebrate) केला जातो. या प्रसंगी लोक त्यांच्या वडिलांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्या वडिलांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या स्थितीनुसार हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतात.

Happy Fathers Day
Happy Fathers Day Gift's: बाबांना हे स्पेशल गिफ्ट द्या; तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

फादर्स डेच्या याच निमित्ताने तुम्ही लाडक्या बाबांना जर काही कविता पाठवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही निवडक कविताही शोधून काढल्या आहेत. ज्या कविता पाठवून तुम्ही लाडक्या बाबांचा दिवस एकदम आनंदी करु शकता. वडिलांवर कविता या नेहमी खासच असायला हव्यात. तुम्हीही तुमच्या बाबांना या कविता पाठवू शकता.

  • स्वत: टपरा मोबाईल वापरुन,
    तुम्हाला स्टायलिश मोबाईल,
    घेऊन देतो, तुमच्या प्रीपेडचे पैसै
    स्वत: भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी
    जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो,हॅपी फादर्स डे!

Happy Fathers Day
Happy Fathers Day Quotes 2023 : फादर्स डे निमित्त आपल्या बाबांना याप्रकारे द्या शुभेच्छा !
  • ज्यांचा नुसता खांद्यावर
    हात जरी असला,
    तरी समोरच्या संकटांना,
    लढा देण्याची प्रेरणा मिळते,
    अशा माझ्या बाबांना, हॅपी फादर्स डे!

  • वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,

    जी तुम्हाला जवळ घेते,
    जेव्हा तुम्ही रडता,
    तुम्हाला ओरडते,
    जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
    तुमच्या यशाचा आनंद साजरा करते,
    जेव्हा तुम्ही जिंकता,
    आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,
    जेव्हा तुम्ही हरता,
    हॅपी फादर्स डे!

Happy Fathers Day
Father's Day 2023 Gift Idea: यंदाच्या 'फादर्स डे' ला बाबासाठी असे करा स्पेशल सरप्राइज प्लान !
  • ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,
    त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,
    कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,
    कारण बाप असतोच जीवनाचा आधार,
    पितृदिनाच्या शुभेच्छा!

  • बाबा, तुम्ही आहात म्हणून
    माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,
    माझ्या यशाची चमक जेव्हा मला
    तुमच्या डोळ्यात दिसते,
    तेव्हा मी भरुन पावतो,
    अशा माझ्या बापमाणसाला हॅपी फादर्स डे!

Happy Fathers Day
Happy Fathers Day : 'बाबा मला कळलेच नाही...' यंदा कधी आहे फादर्स डे ? हा दिवस का साजरा केला जातो ?
  • शोधून मिळत नाही पुण्य,
    सेवार्थाने व्हावे लागते धन्य,
    कोण आहे तुझविणं अन्य?
    ‘बाबा’
    तुजविण माझं जग आहे शून्य, हॅपी फादर्स डे!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com