Weight Loss Medicines: लठ्ठपणा नियंत्राणासाठी WHO चं मोठं पाऊल; औषधांची नवी यादी जाहीर… भारतात दर कमी होतील का?

Weight Loss Medicines Price: लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डब्ल्यूएचओने आपल्या 'आवश्यक औषध यादी'मध्ये (Essential Medicines List) पहिल्यांदाच लठ्ठपणाच्या दोन औषधांचा समावेश केला आहे.
Weight Gain Causes
Weight GainMeta ai
Published On
Summary
  • लठ्ठपणा जगभरातील मोठा आरोग्य धोका आहे.

  • WHO ने वजन कमी करणाऱ्या औषधांना आवश्यक दर्जा दिला.

  • भारतात ही औषधे अत्यंत महागडी आहेत.

आजच्या काळात लठ्ठपणा हा जगभरातील सर्वात मोठा आरोग्याच्या बाबतीतील धोका ठरताना दिसतोय. या समस्येपासून सुटका करण्यासाठी बाजारात वजन कमी करणारी अनेक औषधे उपलब्ध आहेत. अशातच आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी या औषधांना आपल्या आवश्यक औषधांच्या नमुना यादीत (Model List of Essential Medicines – EML) सामावून घेतलं आहे. हा निर्णय फक्त आरोग्य व्यवस्थेसाठीच नव्हे तर सामान्य लोकांच्या आयुष्यातही मोठा बदल घडवणारा ठरू शकतो.

WHO ची आवश्यक औषधांची यादी का महत्त्वाची?

WHO ची ही यादी जगातील 150 हून अधिक देशांमध्ये वापरली जाते आणि त्यात भारताचाही समावेश आहे. या यादीत औषधांची खरेदी, पुरवठा, आरोग्य विमा आणि काही सरकारी योजना याबाबत तपशील दिलेला असतो. भारताने ही यादी अधिकृतपणे स्वीकारली तर पुढील काळात या औषधांच्या किमतींमध्ये मोठी घट होऊ शकते.

Weight Gain Causes
Hidden Heart Attack: कसा ओळखाल सायलेंट हार्ट अटॅक? जीवावर बेतण्यापूर्वी जाणून घ्या

भारतात या औषधांच्या किमती किती?

  • सध्या भारतात वजन कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे खूप महागडी आहेत.

  • Wegovy (Semaglutide)- याची किंमत दर महिन्याला साधारण 17,000 ते 26,000 रुपयांच्या दरम्यान आहे.

  • Mounjaro (Tirzepatide)- याची किंमत 14,000 ते 27,000 रुपयांपर्यंत आहे.

WHO चे औषधांच्या किमतींबाबत मत

WHO चं म्हणणं आहे की, या औषधांच्या जास्त किमतींमुळे त्यांचा वापर मर्यादित लोकांपर्यंतच होतो. ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत ही औषधे पोहोचली पाहिजेत. त्यासाठी जनरिक औषधांना प्रोत्साहन देणं, किंमती कमी करणं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणं आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि मागास भागात त्यांची उपलब्धता करून देणं हे महत्त्वाचं ठरेल.

Weight Gain Causes
Health Tips: महिलांनो...थांबून-थांबून लघवी होण्याचा त्रास होतोय? 'या' 4 गंभीर आजारांचं असू शकतं लक्षण

भारतात लठ्ठपणाचं वाढतं संकट

  • भारतामध्ये लठ्ठपणा आणि जादा वजन असणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

  • 1990 मध्ये साधारण 5.3 कोटी लोक जास्त वजन किंवा लठ्ठपणाने त्रस्त होते.

  • 2021 पर्यंत ही संख्या वाढून 23.5 कोटींवर गेली.

  • योग्य उपाययोजना न केल्यास पुढील काही वर्षांत ही संख्या तब्बल 52 कोटींवर पोहोचू शकते.

Weight Gain Causes
Body Pain Symptoms: शरीरातील 'या' भागांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांची असतील लक्षणं

WHO ची पुढील योजना काय?

WHO चे प्रयत्न केवळ लठ्ठपणा आणि मधुमेहासाठी मर्यादित नाहीत. ते कॅन्सरच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या immune checkpoint inhibitors सारखी महागडी औषधं देखील सर्वसामान्यांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा विचार करतायत.

Weight Gain Causes
Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

भारतासाठी नवी आशा

भारतात दरवर्षी लठ्ठपणा आणि मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसतायत. अशा परिस्थितीत WHO चा हा निर्णय भारतासाठी मोठा बदल घडवू शकतो. जर भारताने ही औषधं आवश्यक औषधांच्या यादीत आणली तर त्यांची किंमत कमी होईल आणि लाखो रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.

Weight Gain Causes
Physiotherapist Doctor title: आता फिजियोथेरेपिस्ट नावापुढे 'डॉ' लावू शकणार नाहीत; सरकारने दिले आदेश
Q

WHO च्या आवश्यक औषधांच्या यादीत कोणती औषधे सामावली आहेत?

A

लठ्ठपणा कमी करणाऱ्या औषधांना आवश्यक दर्जा दिला आहे.

Q

भारतात Wegovy ची किंमत किती आहे?

A

Wegovy ची किंमत प्रति महिना १७,००० ते २६,००० रुपये आहे.

Q

WHO चा निर्णय भारतासाठी का महत्त्वाचा आहे?

A

औषधांच्या किमती कमी होऊन रुग्णांना दिलासा मिळेल.

Q

२०२१ पर्यंत भारतात लठ्ठपणाने त्रस्त लोकांची संख्या किती होती?

A

२०२१ पर्यंत २३.५ कोटी लोक लठ्ठपणाने त्रस्त होते.

Q

भारताने WHO ची यादी स्वीकारल्यास काय फायदा होईल?

A

औषधांच्या किमती कमी होऊन त्यांची उपलब्धता वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com