Physiotherapist Doctor title: आता फिजियोथेरेपिस्ट नावापुढे 'डॉ' लावू शकणार नाहीत; सरकारने दिले आदेश

Physiotherapists can't use Dr: नुकत्याच काढलेल्या एका सरकारी आदेशानुसार, आता फिजियोथेरपीचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना त्यांच्या नावापुढे 'डॉ.' ही पदवी लावता येणार नाही. या आदेशामुळे फिजियोथेरपीच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
Physiotherapist Doctor title
Physiotherapist Doctor titlesaam tv
Published On
Summary
  • फिजिओथेरपिस्टना 'डॉ.' लिहिण्यास प्रतिबंध केला आहे.

  • फक्त वैद्यकीय डॉक्टरच 'डॉ.' वापरू शकतात.

  • 'डॉ.' वापराने रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

आत्तापर्यंत एखादा आजार बरा करणाऱ्या प्रत्येकालाच आपण डॉक्टर म्हणायचो. पण आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. कोणाला आपल्या नावापुढे डॉ. लिहायचं आणि कोणाला नाही, याचं कडक पालन होणार आहे. नव्या आदेशानुसार, आता फिजिओथेरपिस्टना नावापुढे "डॉ." लिहिण्याची परवानगी राहणार नाही.

आरोग्य सेवा महानिदेशालयाने याबाबत आदेश काढला आहे. आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. सुनीता शर्मा यांनी स्पष्ट केलं की, आता केवळ वैद्यकीय डॉक्टरच आपल्या नावापुढे डॉ. असं लावू शकतील. फिजिओथेरपिस्टना हा दर्जा वापरण्याची परवानगी दिल्यास रुग्ण आणि सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो व त्यामुळे चुकीचे उपचार होण्याचा धोका असतो.

काय आहे नेमकं प्रकरण?

महानिदेशालयाने आपल्या पत्रात नमूद केलं आहे की, फिजिओथेरपिस्ट आपल्या नावापुढे 'डॉ.' आणि मागे 'पीटी' लिहित असल्याबाबत भारतातील विविध संघटनांकडून, विशेषत: भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संघटनेकडून (IAPMR) अनेक आक्षेप नोंदवले गेले होते.

या आक्षेपांचा दाखला देत DGHS ने स्पष्ट केले की फिजिओथेरपिस्टना वैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रशिक्षण दिलं जात नाही. त्यामुळे त्यांनी 'डॉ.' हा शब्द वापरणं योग्य नाही. असं केल्याने रुग्ण आणि जनसामान्यांची दिशाभूल होऊन फसवणुकीला खतपाणी मिळू शकते.

Physiotherapist Doctor title
पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

फिजिओथेरपिस्टना 'डॉ.' लावण्याबाबत प्रश्नचिन्ह

फिजिओथेरपिस्टना प्राथमिक उपचार करण्याची परवानगी नसावी, असंही DGHS ने स्पष्ट केलं आहे. त्यांनी केवळ रेफर केलेल्या रुग्णांवर उपचार करावेत कारण चुकीच्या फिजिओथेरपीमुळे रुग्णाची तब्येत अधिक बिघडू शकते.

Physiotherapist Doctor title
7 warning signs of kidney failure: शरीरात 'हे' ७ बदल दिसले तर समजा किडनी होऊ शकते; वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्या

"डॉ." वापरणं बेकायदेशीर

पत्रात नमूद करण्यात आलंय की, पटना उच्च न्यायालय, तामिळनाडू मेडिकल काऊंसिल, बेंगळुरू न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय यांनी आधीच निर्णय दिला आहे की, एखादा फिजिओथेरपिस्ट वैद्यकीय नोंदणी (मेडिकल रजिस्ट्रेशन) शिवाय आपल्या नावापुढे "डॉ." लावतो, तर ते बेकायदेशीर आहे.

Physiotherapist Doctor title
Oral cancer symptoms: तोंडामध्ये 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात

फिजिओथेरपी अभ्यासक्रम 2025

डॉ. सुनीता शर्मा यांनी सांगितलं की, नुकताच NCAHP ने जाहीर केलेल्या फिजिओथेरपी अभ्यासक्रम 2025 मध्ये देखील 'डॉ.' या शब्दाचा उल्लेख टाळावा. त्याऐवजी "फिजिओथेरपिस्ट" हा स्पष्ट आणि सन्मानजनक दर्जा वापरावा, जेणेकरून रुग्णांची चुकीची दिशाभूल होणार नाही.

Physiotherapist Doctor title
Liver: लिव्हरमध्ये घाण जमा झाल्यावर शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल
Q

फिजिओथेरपिस्टना नावापुढे 'डॉ.' लिहिता येईल का?

A

नाही, फिजिओथेरपिस्टना 'डॉ.' लिहिण्यास प्रतिबंध आहे.

Q

'डॉ.' शब्द वापरण्याची परवानगी कोणाला आहे?

A

फक्त वैद्यकीय डॉक्टरांना 'डॉ.' वापरण्याची परवानगी आहे.

Q

फिजिओथेरपिस्टना 'डॉ.' वापरणं का अयोग्य मानलं जाते?

A

त्यांना वैद्यकीय प्रशिक्षण नसल्यामुळे हे अयोग्य आहे.

Q

फिजिओथेरपिस्ट कोणत्या रुग्णांवर उपचार करू शकतात?

A

फक्त रेफर केलेल्या रुग्णांवर उपचार करावेत.

Q

फिजिओथेरपी अभ्यासक्रम २०२५ मध्ये कोणता दर्जा वापरावा?

A

"फिजिओथेरपिस्ट" हा दर्जा वापरावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com